Sunday, June 11, 2023
घर मानिनी Diary कोण आहेत डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम; पंतप्रधानांना पत्र लिहून सांगितले 'सेंगोल'चे महत्त्व

कोण आहेत डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम; पंतप्रधानांना पत्र लिहून सांगितले ‘सेंगोल’चे महत्त्व

Subscribe

तमिळ संस्कृतीमध्ये सेंगोलला खूप महत्त्व आहे. सेंगोल शक्ती आणि न्यायाचे प्रतीक मानले जाते. हे फक्त 1,000 वर्षापूर्वीची वास्तू नाही आहे. चेरा राजांच्या संदर्भात तमिळ महाकाव्यातही याचा उल्लेख आढळतो.

प्रख्यात शास्त्रीय नृत्यांगना डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम (Dr. Padma Subrahmanyam) यांनी 2021 मध्ये सेंगोलवरील (राजदंड) तमिळ लेखाचा अनुवाद पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून पाठवला होता. तेव्हा त्याचा प्रभाव इतका व्यापक होईल आणि सेंगोलबद्दल सर्वत्र चर्चा सुरू होईल, याची त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल. दोन वर्षांनंतर, सोन्याचा राजदंड (Scepter) आता अलाहाबाद संग्रहालयाच्या नेहरू गॅलरीतून 28 मे रोजी नवीन संसद भवनात स्थापित करण्यासाठी दिल्लीत (Delhi) आणला जात आहे.

इंडिया टुडेला दिलेल्या एका खास मुलाखतीत डॉ. सुब्रह्मण्यम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राबद्दल आणि तमिळ संस्कृतीत (Tamil Culture) सेंगोलचे महत्त्व याबद्दल विस्तृत चर्चा केली. यावेळी डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम म्हणाल्या, ‘तो एक तमिळ भाषेतील लेख होता जो तुगलक मासिकात प्रकाशित झाला होता. सेंगोलबद्दलच्या लेखातील मजकूर पाहून मी खूप प्रभावित झाले. त्यात चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांनी त्यांचे शिष्य डॉ. सुब्रमण्यम यांना सेंगोलबद्दल (1978 मध्ये) कसे सांगितले, त्यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये त्याचा उल्लेख केला आहे.

- Advertisement -

तमिळ महाकाव्याचाही उल्लेख

तमिळ संस्कृतीमध्ये सेंगोलला खूप महत्त्व आहे. सोंगोल शक्ती आणि न्यायाचे प्रतीक मानले जाते. हे फक्त 1,000 वर्षापूर्वीची वास्तू नाही आहे. चेरा राजांच्या संदर्भात तमिळ महाकाव्यातही याचा उल्लेख आढळतो. त्याना सुवर्ण राजदंड शोधण्यात रस कसा निर्माण झाला? या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम म्हणाल्या, ‘हे सेंगोल कुठे आहे, हे जाणून घेण्यात मला रस होता. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना अर्पण करण्यात आलेला सेंगोल पंडितजींचे जन्मस्थान असलेल्या आनंद भवनात ठेवण्यात आल्याचे या मासिकाच्या लेखात सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

अशा प्रकारे सेंगोल तयार केला जातो

डॉ. सुब्रह्मण्यम यांनी 1947 मध्ये ब्रिटीशांकडून भारतात सत्ता हस्तांतरित करताना सेंगोल कसे आणि का तयार केले गेले हे थोडक्यात सांगितले. 1947 मध्ये, जेव्हा ब्रिटीशांनी भारतीयांकडे सत्ता हस्तांतरित केली, तेव्हा या महत्त्वपूर्ण प्रसंगाचे प्रतीक म्हणून पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सेंगोल (राजदंड) देण्यात आला. 1947 मध्ये सत्ता हस्तांतरण प्रक्रियेसाठी सी राजगोपालाचारी यांच्या विनंतीवरून तामिळनाडू (तत्कालीन मद्रास प्रेसीडेंसी) मधील तिरुवदुथुराई अधानम यांनी भव्य 5 फूट उंच सेंगोल सुरू केले होते. अधिनामच्या पुजाऱ्याने वुम्मीदी बंगारू चेट्टी यांच्या कुटुंबावर सोन्याचा राजदंड तयार करण्याचे काम सोपवले.

तमिळ भाषेला खूप महत्त्व 

डॉ. सुब्रह्मण्यम म्हणाल्या की, नवीन संसद भवनात सेंगोलच्या स्थापनेसाठी 28 मे रोजी होणार्‍या कार्यक्रमांच्या मालिकेमुळे मला खूप आनंद झाला आहे. यामुळे आपल्या खासदारांना देशसेवा करण्यास प्रवृत्त होईल. तमिळ संस्कृतीत सेंगोलचे महत्त्व सांगताना डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम यांनी स्पष्ट केले की, ‘सेंगोल सर्व तमिळ लोकांना माहीत आहे, मात्र आता राजेशाही नसल्याने त्याचे महत्त्व विसरले आहे. मला वाटते सेंगोलची ही संकल्पना केवळ तामिळनाडूतच नाही तर संपूर्ण भारतात होती. पण, दक्षिणेला आपला वारसा आणि परंपरा जपण्यासाठी अधिक भाग्यवान ठरले आहे. पद्मा सुब्रह्मण्यम म्हणल्या की सेंगोल हे नवीन संसद भवनात ‘भारताचा अभिमान’ म्हणून प्रदर्शित केले जाईल याचा मला खूप आनंद आहे.

सेंगोल म्हणजे काय?

सेंगोल हा शब्द संस्कृत शब्द ‘संक’ पासून आला आहे, ज्याचा अर्थ ‘शंख’ असा होतो. शंख हे वैदिक परंपरेतील पुरुषत्वाच्या प्रकटतेचे प्रतीक आहे. राज्याच्या विस्तार, प्रभाव आणि सार्वभौमत्वाशीही ते जोडलेले आहे. त्याचप्रमाणे सेंगोलचे वर्णन राज्याच्या सार्वभौमत्वाचे, प्रभावाचे, विस्ताराचे आणि पौरुषाचे प्रतीक म्हणून केले जाते. परंपरेत सेंगोलला ‘राजदंड’ असे म्हणतात जे राजपुरोहितांनी राजाला दिले होते. वैदिक परंपरेत अधिकाराचे दोन प्रकार आहेत. राजसत्तेसाठी ‘राजदंड’ आणि धर्मसत्तेसाठी ‘धर्मदंड’. राजदंड राजाकडे होता आणि धर्मदंड राजपुरोहिताकडे होता.

कोण आहेत पद्मा सुब्रह्मण्यम पद्म

डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम हे प्रसिद्ध नृत्यांगना आहेत. त्यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1943 रोजी मद्रास येथे झाला. त्यांचे वडील कृष्णस्वामी सुब्रह्मण्यम हे प्रसिद्ध दिग्दर्शक होते आणि आई मीनाक्षी सुब्रह्मण्यम संगीतकार होत्या. पद्मा 14 वर्षांची होती, तेव्हापासूनच तिने नृत्य शिकायला सुरुवात केली. पद्माने संगीतात ग्रॅज्युएशन केले आणि नृत्यात पीएचडी केली. त्यांनी अनेक शोधनिबंध आणि पुस्तके लिहिली आहेत. पद्मा सुब्रह्मण्यम यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 2003 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. आपल्या नृत्य कारकिर्दीत त्याने 100 हून अधिक पुरस्कार जिंकले आहेत.


हेही वाचा – धक्कादायक! बहिणींची घोड्यावरून वरात काढल्यामुळे जात पंचायतीने केले बहिष्कृत

 

- Advertisment -

Manini