Wednesday, December 11, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीFashionHair care : लांब, मजबूत केसांसाठी खावेत हे पदार्थ

Hair care : लांब, मजबूत केसांसाठी खावेत हे पदार्थ

Subscribe

बदलती लाइफस्टाइल आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींचा केवळ आरोग्यावरच नाही तर केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. हल्ली बऱ्याच जणांना केसांच्या विविध तक्रारी जाणवतात. ज्यामध्ये केसगळती, निस्तेज केस, केस पांढरे होणे, डॅन्ड्रफ अशा तक्रारी जाणवतात. केसांच्या या तक्रारीपासून सुटका होण्यासाठी अनेकजण पार्लरमध्ये जाऊन महागडी हेअर केअर ट्रिटमेंट घेतात. पण, अनेकदा महागड्या ट्रिटमेंटनेही केसांच्या तक्रारी तशाच राहतात. अशावेळी तुम्ही केसांच्या आरोग्यासाठी आहाराकडे लक्ष द्यायला हवे. आहाराचा केसांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे घनदाट केसांसाठी तुम्ही आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा, हे पाहूयात,

चिया सिड्स –

चिया सिड्समध्ये ओमेगा-३ फॅटी असतात. यामुळे टाळू निरोगी राहतो आणि केस घनदाट होतात.

- Advertisement -

अंडी –

अंड्यामध्ये प्रोटीन आणि बायोटीन आढळते. ज्यामुळे केसांची वाढ होते. त्यामुळे निरोगी केसांसाठी तुम्ही अंडी खाऊ शकता.

पालक –

पालकामध्ये लोह, व्हिटॅमिन्स आणि फोलेट आढळते. याच्या सेवनाने रक्ताभिसरण सुधारते आणि केस लांब, दाट होण्यास मदत होते.

- Advertisement -

अवाकॅडो –

अवाकॅडो केसांशी संबधित अनेक समस्यांपासून बचाव करण्याचे काम करते. यात व्हिटॅमिन इ असते. त्यामुळे केस मुळापासून मजबूत आणि घट्ट होतात.

अक्रोड –

अकोड खाणे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यात अॅटी-ऑक्सिडंट, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते. त्यामुळे केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी अक्रोड खाण्याचा सल्ला दिला जातो.

आवळा –

आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन इ असते, जे केस गळणे आणि तुटणे थांबवते.

रताळे –

रताळे केसांसाठी फायदेशीर आहे. यातील बीटा- कॅरोटीन केसांची वाढ करण्यास आणि स्काल्प निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरते.

बेरी –

बेरीमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स , अॅटी-ऑक्सिडंट आढळतात. हे कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देतात. याशिवाय स्ट्रॉबेरी ही व्हिटॅमिन सी चा एक उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे केसांतील कोंडा निघून जातो.

 

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini