Prepare time: 20 min
Cook: 25 - 30 min
Ready in: 45 min
Ingredients
- डिंक - 1 कप
- गव्हाचे पीठ - दिड कप
- गूळ पावडर - अर्धी वाटी
- तूप - 1 कप
- खोबरे - अर्धी वाटी
- ड्रायफूट्स
- वेलची पावडर
Directions
- डिंकाचे लाडू तयार करण्यासाठी एक जाड तळ असणारा पॅन घ्यावा. यात तूप गरम करावे.
- तूप गरम झाल्यावर ड्रायफूट्स आणि खोबरे भाजून घ्यावेत आणि थंड होण्यासाठी ठेवावेत.
- तूपामध्ये डिंक भाजून घ्यावा.
- डिंक फूलेपर्यत भाजल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा.
- यानंतर पुन्हा पॅनमध्ये तूप गरम करावे. तूप गरम झाल्यावर त्यात गव्हाचे पीठ गोल्डन रंगाचे होईपर्यत परतून घ्या.
- या पीठात ड्रायफूट्स आणि डिंक मिक्स करा.
- थोड्या वेळाने वेलची पावडर आणि गूळ घालावा.
- सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.
- मिश्रणाचे लाडू बांधून घ्यावेत आणि हवाबंद डब्यात साठवावेत.