वातावरणात होणाऱ्या बदलामुळे आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते. अशात आपल्या त्वचेची काळजी घेणं फार गरजेचं आहे. घरगुती स्क्रब या समस्येवर एक चांगला पर्याय आहे. हे केवळ त्वचेला स्वच्छच करण्याचंच काम करत नाही तर त्वचेला नैसर्गिक पोषणही देते. बेसन, ओटस, कॉफी, मध आणि साखर अशा सहज मिळणाऱ्या पदार्थांपासून बनलेला हा स्क्रब त्वचेला नुकसान न पोहोचवता डेड स्किन सेल्स काढून टाकतो आणि त्वचा मुलायम तसेच हायड्रेट करून त्वचा नरम ठेवतो. ज्यामुळे त्वचेचं स्वास्थ्य आणि सौंदर्य टिकून राहतं. जाणून घेऊयात घरगुती फेस स्क्रब विषयी जो तुम्ही सहज बनवू शकता.
बेसन आणि दही :
बेसनामध्ये दही मिसळून याची पेस्ट तयार करा. याला चेहऱ्यावर लावून हलक्या हातांनी मसाज करा. हा स्क्रव त्वचेला साफ आणि मुलायम बनवतो. सोबतच त्वचेला पोषणही देतो.
साखर आणि मध :
साखर आणि मध एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. आणि याला चेहऱ्यावर लावा. हा स्क्रब त्वचेला एक्सफोलिएट करतो. ज्यात असलेल्या लिंबूमुळे त्वचा स्वच्छ होते आणि साखर त्वचेवरील डेड स्किन सेल्स हटवण्यात मदत करते.
ओटस आणि दूध :
ओटस मिक्सरमध्ये वाटून त्यात दूध मिसळा आणि त्याची पेस्ट तयार करा. याला चेहऱ्यावर लावून सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा. हा स्क्रब त्वचेला मुलायम करुन त्वचा ग्लोइंग करते.
कॉफी आणि नारळ तेल :
कॉफी पावडरमध्ये नारळ तेल मिसळून त्याची पेस्ट तयार करा. या स्क्रबने त्वचा खोलवर स्वच्छ होते आणि नरमदेखील राहते तसेच चमकदारही होते.
संत्र्यांच्या साली आणि गुलाब जल :
संत्र्याच्या सुक्या सालीपासून बनलेल्या पावडरमध्ये गुलाब जल मिसळा. हा स्क्रब त्वचेला नैसर्गिक चमक देतो आणि काळपटपणा हटवण्यास मदत करतो.
हळद आणि बेसन :
बेसनामध्ये हळद आणि गुलाब जल मिसळा. हा स्क्रब त्वचेला फ्रेश, मुलायम आणि ग्लोइंग बनवण्यास मदत करतो. सोबतच त्वचेवरील डाग-धब्बे कमी करण्यासही मदत करतो.
तांदळाचे पीठ आणि दही :
तांदळाचे पीठ दह्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. हे डेड स्किन सेल्स काढून टाकते आणि त्वचेवर चमक आणते तसेच त्वचा मुलायमही करते.
हेही वाचा : Wedge Heel Footwear : हटके लूकसाठी ट्राय करा वेज हिल्स
Edited By – Tanvi Gundaye