दिवाळी यायला अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. लोक या दिवाळीच्या दिवसांमध्ये रांगोळी, दिवे आणि कंदील यांनी घर सजवण्याबरोबरच धनाची देवी असणारी लक्ष्मी आणि गणपतीचीही पूजा केली जाते. वास्तुशास्त्रानुसार, दिवाळीच्या दिवसात केलेल्या उपायांनी, पूजाअर्चेने जीवनात सुखसमृद्धी येते. एका बाजूला जिथे लोक दिवाळीच्या 10-15 दिवस आधीपासूनच घराच्या साफसफाईच्या कामात लागलेली असतात. तर उत्सवाच्या दिवसात हेच लोक घराच्या सजावटीसाठी वास्तूशास्त्राच्या नियमांचंही पालन करताना दिसतात. खरंतर, वास्तूशास्त्र आपल्या जीवनाशी खूप जोडलेले आहे. घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची दशा आणि दिशा यांचा सरळ प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो. अशात घरात लावली जाणारी काही झाडं अशी आहेत की जी घरात आणली तर जीवनात आनंद आणि सुखसमृद्धी येऊ शकते. सोबतच घरात सकारात्मकतेचा संचार होतो.
1. मनीप्लांट :
दिवाळीच्या आधी आपल्या घराची शोभा वाढवण्यासाठी आणि सुखशांतीसाठी हे झाड तुम्ही लावू शकता. मनीप्लांट घरी लावल्याने घरात समृद्धी येते. सोबतच संपत्तीचीही भरभराट होते. मनीप्लांट घराचे वातावरणही शुद्ध ठेवते. वास्तुशास्त्रानुसार हे झाड घरी लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते.
2. व्हाइट पलाश :
वास्तूशास्त्रानुसार, व्हाइट पलाशचे झाडही खूप शुभ मानण्यात आले आहे. असं म्हटलं जातं की या झाडामध्ये लक्ष्मीमाता निवास करत असते. यासाठी या झाडाचे फूल लक्ष्मीदेवीच्या पूजेकरता समाविष्ट केलं जातं. अशात जर तुम्ही दिवाळीपूर्वी हे झाड घरात लावत असाल तर घरात सुखसमृद्धी यांची भरभराट होऊ शकते. घरातील नकारात्मकतेचा नाश होतो. आणि जीवनात सकारात्मकतेचा संचार होतो.
3. जेड प्लांट :
या झाडाला वास्तूशास्त्रानुसार खूपच शुभ मानण्यात आलं आहे. असं म्हटलं जातं की हे झाड जिथे कुठे असेल तिथे लक्ष्मीदेवीचा वास असतो. तिची विशेष कृपा त्या जागेवर असते. या झाडाला क्रासुला प्लांटदेखील म्हटलं जातं. जेड प्लांटला दिवाळीत घरी आणा आणि ते घराच्या दरवाजाच्या उजव्या दिशेला लावा. असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.
4. बांबू ट्री :
बांबू प्लांट सुखसमृद्धी आणि शांतीचे प्रतीक समजले जाते. हे झाड घरात लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. बांबू प्लांट तुम्ही तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा छतावर किंवा घराच्या एखाद्या कोपऱ्यात लावू शकता. हे केवळ दिवाळीत घराची शानच वाढवत नाही तर घरात सुखशांतीचे वातावरणही तयार करते.
हेही वाचा : Dhanteres 2024 : धनत्रयोदशीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त
Edited By – Tanvi Gundaye