आजकालच्या धावपळीच्या जीवनात शारीरिकरित्या तर थकतोच पण मानसिकरित्या देखील थकून जातो. निरोगी राहण्यासाठी मानसिक आरोग्य चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक वेळा मानसिक थकवा आपल्या विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो. तुम्हालाही काम करताना तुमचे मन शांत ठेवायचे असेल तर तुम्ही यासाठी काही क्रिया करू शकता. आज आपण जाणून घेऊयात तुमचा मेंदू थंड आणि तीक्ष्ण करण्यासाठी कोणत्या 5 क्रिया करू शकता.
कोडे असणारे खेळ खेळा
तुमचा मेंदू सक्रिय ठेवण्यासाठी त्याचा व्यायाम करणे गरजेचे आहे, यासाठी तुम्ही सुडोकू, पझल गेम, शब्दकोडे किंवा कोडी सोडवणारे गेम खेळावेत, यामुळे तुमचा मेंदू सक्रिय राहण्यास मदत होते आणि तुमची विचार करण्याची क्षमता वाढते.
नवीन कौशलय शिका
तुमच्या दैनंदिन रुटीन पासून थोडी विश्रांती घेऊन. काहीतरी नवीन करा जसे की तुम्ही एक नवीन प्रकारचा खेळ खेळू शकता, नवीन भाषा शिकू शकता, नवीन कौशल्ये शिकल्याने तुम्हाला सकारात्मक वाटते आणि तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होतो मन शांत राहते.
पुस्तक वाचा
तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत पुस्तक वाचू शकता. झोपण्यापूर्वी हे करणे खूप फायदेशीर आहे. यामुळे मानसिक थकवा दूर होतो. जेव्हा तुम्ही एकाग्रतेची पुस्तके वाचता तेव्हा तुमची एकाग्रता वाढते. नवीन विषयावर विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता विकसित होते.
ध्यान करा
ध्यान अवश्य केले पाहिजे, यामुळे नकारात्मक विचार दूर होण्यास मदत होते. एक नवीन सकारात्मक ऊर्जा मिळते. नियमितपणे व्यायाम करणे देखील महत्त्वाचे आहे, यामुळे मेंदूमध्ये रक्त प्रवाह वाढतो.
संगीत ऐका
तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत संगीत ऐकू शकता. चांगले संगीत ऐकल्याने मन प्रसन्न राहते. तणावामुळे शरीरात वाढणाऱ्या कोर्टिसोलच्या पातळीला नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
व्यायाम आणि योग
दररोज किमान 30 मिनिटे शारीरिक व्यायाम केल्याने मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो आणि ताजेपणा येतो. योग, प्राणायाम आणि ध्यान यामुळे मानसिक स्थिरता आणि एकाग्रता वाढते.
पौष्टिक आहार
तुमच्या आहारात भरपूर फळं, भाज्या, ओमेगाने समृद्ध खाद्यपदार्थ, नट्स आणि भरपूर पाणी असावं. हे मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी महत्त्वपूर्ण आहे.
Edited By : Prachi Manjrekar