हिंदू धर्मात मकर संक्रात हा महत्वाचा सण आहे. वर्षाचा पहिला सण मकर संक्रात असतो. यंदा 14 जानेवारीला मंगळवारी मकर संक्रात साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान सूर्य 09.03 वाजता मकर राशीत प्रवेश करेल.
या दिवशी काही गोष्टींचे दान करणे शुभ मानलं जाते. या दानामुळे घरात सुख-समृद्धी नांदण्यास सुरुवात होते. जाणून घेऊयात, या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करणे शुभ मानले जाते.
काळे तीळ –
मकर संक्रातीच्या दिवशी काळ्या तीळाचे दान करणे शुभ मानले जाते. तुम्ही तीळाचे लाडू, तीळाचे तेल दान करू शकता. या गोष्टी दान केल्याने कुटूंबात सुख-शांती नांदते. याशिवाय कुंडलीतील दोष नाहीसा होतो.
धान्य –
संक्रातीच्या दिवशी तांदूळ, गहू आणि डाळींचे दान करणे शुभ मानले जाते. तुम्ही हे पदार्थ गरजूंना दान करू शकता.
गुळ आणि तांदूळ –
गुळ आणि तांदळाचे दान मकर संक्रातीदिनी करणे शुभ मानले जाते. तुम्ही जर गरजूंना आणि ब्राम्हणांना गुळ आणि तांदळाचे दान दिलेत तर पितृदोषातून मुक्त होण्यास सुरुवात होते असे म्हटले जाते. याशिवाय देवी लक्ष्मीचा कृपा आर्शिवाद आपल्याला प्राप्त होतो.
कपडे –
संक्रातीच्या दिवशी ऋतुनूसार तुम्ही कपड्यांचे दान करू शकता. या दानामुळे घरात सकारात्मक उर्जा वाढते आणि आयुष्यातील आनंदही वाढतो.
गायीची सेवा करावी –
मकर संक्रातीच्या दिवशी गायीला चारा देणं शुभ मानले जाते. असे केल्याने भगवान विष्णूंचा आर्शिवाद प्राप्त होतो.
कुमांरीकांना वस्तू दान शकता –
पूर्वीच्या काळात मकर संक्रातीच्या निमित्ताने ब्राम्हण भोजन दिले जायचे. आता तुम्ही कुमांरीकांना भोजन देऊ शकता. याव्यतिरीक्त कुमांरीकांना शालेय वस्तू, अन्न, धान्य दान करू शकता.
हेही पाहा –