आपल्या प्रत्येकालाच आपली त्वचा सुंदर असावी असं वाटत असत. यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. मेकअप प्रॉडक्टसह काही ब्यूटी टूल्सचा देखील वापर करतो. या ब्यूटी टूलमुळे आपला चेहरा चांगला देखील दिसतो. या ब्यूटी टूल्समुळे मेकअप करणे किंवा स्पा करणे देखील सोपे जाते. हल्ली प्रत्येक ठिकाणी मार्केटमध्ये किंवा ऑनलाइन देखील तुम्हाला ब्यूटी टूल्स सहजपणे मिळतील.
बऱ्याचदा आपल्याला काही ब्यूटी टूल्स माहिती नसतात. त्यामुळे आपल्यलाकडून काही चुका होतात . त्या चुका होऊ नये म्हणून आज आपण जाणून घेऊयात, ब्यूटी टूल्स वापरताना कोणत्या चुका टाळाव्या.
प्रोडक्टस डिस्क्रिप्शन न वाचणे
कोणत्याही प्रोडक्टच डिस्क्रिप्शन हे खूप महत्वाच असत. बऱ्याचदा आपण डिस्क्रिप्शन न वाचता प्रोडक्ट वापरतो. हे खूप घातक ठरू शकते. जर आपण ब्यूटी टूल्स न वाचता वापरले तर आपल्याला त्वचा खराब होऊ शकते. त्यामुळे कोणतेही ब्यूटी टूल्स वापरताना त्याच डिस्क्रिप्शन वाचणे अत्यंत गरजेचं आहे.
खराब झालेले टूल्स वापरणे
बरेच लोक खराब झालेले ब्यूटी टूल्स वापरतात त्यामुळे आपला चेहरा खराब होण्याची संभाव्यता वाढते. बऱ्याचदा बरेच लोक, ब्यूटी टूल्स वापरून कुठेही ठेवतात, पुन्हा हे टूल्स न धुता वापरतात. त्यामुळे हे लगेच खराब होतात. चेहरा खडबडीत होतो. चेहऱ्यावर इरिटेशन निर्माण होते. तसेच मेकअप टूल्ससह मेकअपचा ब्रश आणि ब्लेंडर देखील धुवा.
त्वचा जास्त रगडणे
बऱ्याचदा आपण त्वचा ब्रशने किंवा स्क्रबने जोरात रगडून काढतो. याने त्वचा लाल होते, त्यामुळे त्वचा जास्त जोरात रगडून काढू नका.
ब्यूटी टूल्सची चांगली काळजी घ्या
ब्यूटी टूल्सची चांगल्या प्रकारे काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला त्यांच्या मॅन्टेन्सकडे लक्ष देणे अनिवार्य आहे. बऱ्याचदा आपण हे वापरून कुठेही ठेवतो. त्यामुळे हे टूल्स बऱ्याचदा खराब होतात. त्यामुळे त्यांची योग्यरीत्या काळजी घ्या.
हेही वाचा : Dry eyelashes : थंडीमुळे कोरड्या पडलेल्या पापण्यांना असे करा मॉईश्चरायझ
Edited By : Prachi Manjrekar