Monday, September 25, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health संपूर्ण कुटुंब एकाच साबणाने आंघोळ करतयं, मग व्हा सावध

संपूर्ण कुटुंब एकाच साबणाने आंघोळ करतयं, मग व्हा सावध

Subscribe

घर आणि कुटुंब म्हटलं की सगळ्याच गोष्टी एकमेकांबरोबर शेअर करणं हे आलचं. यात प्रेमाबरोबरच जेवणाचं ताट ते कपड्यापर्यंत ठिक आहे. पण जर तुम्ही सगळेच आंघोळीसाठी एकच साबण आणि टॉवेल वापरत असाल तर वेळीच सावध व्हा.

- Advertisement -

कारण जो साबण, टॉवेल तुम्ही वापरताय तो त्वचेवरील सूक्ष्म जंतू नष्ट करण्यासाठी आहे. पण जर एकानंतर दुसरा नंतर तिसरा आणि चौथा असे सगळेच एकाच साबणाने शरीर स्वच्छ करत असतील तर साबण वेगवेगळ्या प्रकारच्या जंतूंच घरच झालंय समजा.

- Advertisement -

कारण साबणाच्या माध्यमातून साबणावर असलेले जंतू एका व्यक्तीच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत सहज पोहचतात.

यात प्रामुख्याने ई- कोली, शिगेला बॅक्टेरिया , साल्मोनेला , नोरोयरस, स्टॅप व्हायरस, रोटाव्हायरस सारखे बॅक्टेरिया साबणावर बराच काळ असतात.

जर एकाही व्यक्तीच्या शरीरावर रेशेस, जखम असेल तर त्याच्या मार्फत ते दुसऱ्याच्या त्वचेत सहज प्रवेश करतात. यामुळे सहसा लिक्विड सोप किंवा बॉडी वॉशचा वापर करावा. जेणेकरून त्वचा संसर्गाचा धोका टळतो.

- Advertisment -

Manini