Thursday, February 22, 2024
घरमानिनीRelationshipनात्यातला संशय पडू शकतो महागात

नात्यातला संशय पडू शकतो महागात

Subscribe

'जिथे विश्वासाचं पाखरू उडालं, तिथे प्रेम नावाची गोष्ट टिकत नाही',असं म्हटलं जातं. अगदी त्याचप्रमाणे एकमेकास पूरक असणारे जोडीदार सुद्धा संशयामुळे दुरावले जातात.

कधी कधी संशयामुळे नाती दुरावली जातात.जीवनात जोडीदारांमध्ये समंजसपणा नसला तर अडचणी निर्माण होतात. जसं की एकमेकांवर संशय घेणे, एकमेकांचा फोन चेक करणे, त्याचबरोबर फोनवरील सोशल मीडिया साइट्स तपासणे. जर या गोष्टी वारंवार होत असतील तर मात्र आपल्या पार्टनरचा आपल्यावरील विश्वास कमी व्हायला लागतो. ‘जिथे विश्वासाचं पाखरू उडालं, तिथे प्रेम नावाची गोष्ट टिकत नाही’,असं म्हटलं जातं. अगदी त्याचप्रमाणे एकमेकास पूरक असणारे जोडीदार सुद्धा संशयामुळे दुरावले जातात.

लग्नानंतर पत्नीचे आणि पतीचे संबंध हे विश्वासाहर्ता जपणारे असतील तर दोघांमध्ये आदर सुद्धा तितकाच राहतो. पण जर तुमचं वागणं तुमच्या पार्टनरला संशयास्पद वाटत असेल तर मात्र नात्यात गुंता अजून वाढत जातो. काही वेळा तर शिवीगाळ सुद्धा केली जाते आणि त्यामुळे कित्येक दांपत्यांना एकत्र राहण्यास आवडत नाही.

- Advertisement -

पण संशय दूर करून नात्याची पुन्हा नव्याने सुरुवात करायची असेल तर काय करावे ?

तुम्ही तुमच्या पार्टनरशी मनसोक्त बोला

- Advertisement -

जोपर्यंत तुम्ही तुमच्या पार्टनरशी मनमोकळेपणाने बोलत नाही किंवा त्याच्या मनातील शंका जाणून घेत नाही तोपर्यंत तिचा किंवा त्याचा विश्वास बसणं अशक्य आहे. त्यामुळे मनात काही न ठेवता योग्य वेळी बोलत चला.

हेही वाचा :Relationship…. टॉक्सिक आणि केअरिंग पार्टनरमध्ये असतो ‘हा’ फरक

इतरांचे अनुभव किंवा सल्ले ऐकण्याआधी खात्री करा

आपल्या पार्टनर विषयी जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीला सांगतो तेव्हा ती व्यक्ती त्याच्या परीने अनुभव सांगते किंवा तिला जे योग्य वाटेल तसा सल्ला देते . पण तुमचा पार्टनर कसा आहे हे फक्त तुम्हालाच माहीत असल्याने त्याच्याविषयी खात्री करूनच निर्णय घ्या.

एकमेकांसाठी वेळ काढा
एकमेकांची मने जुळण्यासाठी आणि एकमेकांच्या आवडीनिवडी कळण्यासाठी काही वेळ एकत्र घालवा.

जोडीदाराच्या जागी स्वतःला ठेवा
काही वेळा आपण स्वतःचा विचार करून जोडीदारालाच दोषी मानतो. पण त्याच्या जागी स्वतःला ठेवून विचार केला तर अनेक प्रश्न आणि संशय दूर होतात.

नात्यात एकमेकांना स्पेस द्या
एकमेकांसाठी वेळ काढणं जितके महत्त्वाचे आहे तितकाच एखाद्या व्यक्तीचा स्पेस सुद्धा महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला तिचा स्पेस जगू द्या.

- Advertisment -

Manini