Prepare time: 20 - 25 mins
Cook: 15 min
Ready in: 45 min
Ingredients
- तूरडाळ - 1/2 कप
- शेवग्याच्या शेंगाचे तुकडे - 8 ते 9
- किसलेला नारळ - अर्धी वाटी
- हिरव्या मिरच्या 4
- मोहोरी
- जिरे
- हिंग
- हळद
- तेल
- कढीपत्ता - 7 ते 8
- गूळ
- आमसुल
- मीठ
Directions
- प्रेशर कुकरमध्ये तूरडाळ 5 ते 6 शिट्ट्या करून शिजवून घ्यावी आणि 2 ते 3 शिट्ट्या करून शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्याव्यात.
- शेवग्याच्या शेंगा आणि आणि तूरडाळ एकत्र शिजवू नयेत. फक्त शेंगा शिजवताना त्यात थोडे मीठ टाकावे.
- तूरडाळ शिजल्यावर घाटून घ्यावी. दुसरीकडे पातेल्यात तेल गरम करण्यास ठेवावे.
- तेल तापल्यावर मोहोरी, जिरं, हिंग, हळद, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, किसेलेलं खोबरं टाकून फोडणी द्यावी.
- कढीपत्त्याचा सुगंध आल्यावर त्यात डाळ घालावी. गरजेनुसार पाणी घालावे.
- आमटीला एक उकळी आल्यावर शिजवलेल्या शेंगा घाल्याव्यात.
- यानंतर गोडा मसाला, आमसुलं आणि मीठ घालून मध्यम आचेवर 3 मिनिटे उकळी आणावी.
- उकळी आल्यावर कोथिंबीर टाकून गरमा गरम शेवग्याच्या शेंगाची आमटी भाकरीसोबत सर्व्ह करावी.