Prepare time: 5 min
Cook: 5 min
Ready in: 10-12 mins
Ingredients
- ब्रेडचे स्लाइस - 10 ते 12
- हळद
- कढीपत्ता
- हिरव्या मिरच्या 2
- कांदा - 1
- मोहरी
- हिंग
- साखर
- कोथिंबीर
- लिंबाचा रस
- तेल
- मीठ
Directions
- ब्रेडच्या स्लाइसचे छोटे चौकोनी तुकडे करून घ्यावेत.
- कढईत तेल गरम करण्यास ठेवा. तेल गरम झाले की, कढीपत्ता, मोहोरी,हिंग, हळद टाकून फोडणी द्यावी.
- यानंतर फोडणीत हिरव्या मिरच्या, कांदा तेलात परतून घ्याव्यात.
- ब्रेडचे तुकडे परतवून घ्या आणि चिमूटभर साखर त्यात घालावी.
- आता झाकण ठेवून मंद आचेवर 2 ते 3 मिनीटे वाफ काढावी.
- सर्वात शेवटी चवीनुसार मीठ टाकावे आणि लिंबाचा रस, कोथिंबीर टाकून गरमा गरम सर्व्ह करण्यास तयार झाले आहे.