दिवाळीनंतर लगेचच भाऊबिजेचा सण येतो आणि विशेषत: या दिवशी आपल्याला फॅशनेबल आऊटफिट्स घालायला आवडतात. तसेच आता आपण एथनिक आऊटफिटचे काही डिझाइन्स जाणून घेणार आहोत जे तुम्ही भाऊबीजेच्या निमित्ताने घालू शकता. अशातच आता आपण हे लूक्स कसे स्टाईल करू शकतो हे पाहणार आहोत.
1. एथनिक सिम्पल साडी किंवा ड्रेसेस
जर तुम्हाला भाऊबीजेच्या दिवशी साडी नेसायची असेल, तर सिम्पल नेटेड डिझाइन साडी तुमच्यासाठी उत्तम असेल. ही नेटेड सुंदर साडी तुम्ही अगदी सहज पटकन नेसू शकता. अशाच साध्या बॉर्डर वर्कची साडी तुम्हाला जवळपास 2,000 रुपयांना बाजारात सहज मिळू शकते. तसेच या प्रकारच्या लूक्सवर, तुम्ही केसांचा बन बांधू शकता आणि केसांच्या अॅक्सेसरीजसाठी गजरा देखील त्यावर लावू शकता.
2. चिकनकरी सूट
सोबर आणि बारीक लूकसाठी तुम्ही पेस्टल कलरवर चिकनकारी वर्क असलेला सिम्पल आणि बारीक डिझाइन्सचा सूट घालू शकता. तसेच या प्रकारची डिझाईन तुम्हाला जवळपास 1,500 रुपयांना बाजारात सहज मिळेल. ट्रेंडी फॅशनमध्ये असलेला हा ड्रेस कोणत्याही कार्यक्रमात तुमच्यावर छान उठून दिसेल. या प्रकारच्या लुकवर, मोत्याचे दागिने स्टाईल तुम्ही स्टाईल करू शकता आणि फ्रीजी हेअरस्टाईल त्यावर जर का केली तर ती देखील त्या ड्रेसवर शोभून दिसेल.
3. डिपनेक सूट
जर तुम्हाला उंच दिसायचे असेल तर तुम्ही या प्रकारच्या फ्लोअर लेन्थ सूटची निवड करू शकता. हा सुंदर आणि लॉन्ग सूट डिझायनर पद्धतीने जर शिवलात तर त्याला हेवी लूक मिळतेल. तसेच तुम्ही या प्रकारच्या सूटचा कापड खरेदी करू शकता आणि त्याचा ड्रेस तयार करू शकता. तसेच तुम्हाला या प्रकारचे डिझायनर सूट्स बाजारात 1,000 ते 1,500 रुपयांना सहज मिळतील.
हेही वाचा : फेस्टीव सिझनसाठी खास हेयरस्टाईल