ब्लॉउजला स्टायलिश लुक देण्यासाठी आपण बहुतेक वेळा अनेक प्रकारचे ब्लॉउज डिझाइन्स बघतो. अशातच जशी आपली साडी असते तसाच ब्लॉउज आपण शिवतो. जेणेकरून तुमचा ब्लॉउज आकर्षक वाटेल. तसेच साडीचा ट्रेंड हा सदाबहार राहतो आणि साडीला स्टायलिश लुक देण्यासाठी ब्लाउजला आपल्या आवडीनुसार स्टाईल करता येत. जर का तुम्हाला ब्लॉउजची डिझाइन्स कशी करायची माहित नसेल तर आजकाल सोशल मीडियाद्वारे तुम्हाला तुमचा लूक स्टाइल करण्यासाठी अनेक टिप्स सहज मिळतील. बर्याच वेळा, घाईमुळे, किंवा डिझाइन्स समजत नसल्यामुळे आपण साध्या डिसाईन्सचे ब्लाउज निवडतो, परंतु नंतर आपल्या चांगल्या हेवी साडीवर शोभून दिसत नाही.
अशातच जर का तुम्हालाही तुमच्या साडीमध्ये आकर्षक दिसायचे असेल, तर साध्या ब्लाउजला स्टायलिश लूक देण्यासाठी या टिप्स वापरून पहा. तसेच तुम्ही तुमचा कोणताही साधा ब्लाउज फॅन्सी कसा बनवू शकता हे आपण आता जाणून घेऊया….
शोल्डर ब्लॉउजला अशाप्रकारे करा डिझाइन्स
आजकाल प्लेन स्लीव्हलेस ब्लाउजचा खूप ट्रेंड आहे. पण स्लीव्हलेस ब्लाउजला स्टायलिश लूक द्यायचा असेल तर तुम्ही शोल्डरवर चैनीच्या मदतीने अशी डिसाइन्स करू शकता. तसेच यासाठी तुम्ही मोती, मणी किंवा फ्लोरल डिझाइन असलेली चैनीची डिसाईन्स निवडा आणि 3 ते 4 लेयरमध्ये ब्लाउजच्या शोल्डरवर अशा प्रकारे डिसाईन्स करा. अशातच हे ब्लॉउज दिसायला अगदी स्टायलिश दिसेल.
ब्लॉउजची नेकलाईन डिसाईन अशी करा स्टाईल
ब्लाउज नेकलाइनच्या अनेक डिझाइन्स तुम्हाला पाहायला मिळतील. पण जर तुमचा ब्लाउज साधा असेल तर तुम्ही त्यात गोटा-पत्तीची लेस लावू शकता. तसेच तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ब्लाउजच्या मॅचिंग फॅब्रिकच्या साहाय्याने लेस किंवा फक्त बारीक पाईपिंग देखील लावू शकता. या प्रकारची डिसाईन्स विशेषतः व्ही-नेकलाइनवर सुंदर दिसते.
ब्लाउजला डिसाईन्स करताना ‘या’ स्टाइलिंग टिप्स नक्की वापरा
- हल्ली पेंडेंट आणि टॅसेल्स अशा डिसाईन्स आजकाल खूप लोकप्रिय झाल्या आहेत.
- अशातच ब्लॉउजच्या खालच्या भागाला तुम्हाला हव्या त्या डिसाईन्समध्ये ते पॅटर्न तुम्ही स्टाईल करू शकता.
- दुसरीकडे, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही हाताच्या स्लीव्हजवर फिक्स केलेल्या टॅसेल्सची लेस देखील डिझाईन्स करू शकता.
- यामध्ये तुम्हाला पर्ल डिझाईन सर्वात जास्त ट्रेंडमध्ये दिसेल .
- तसेच मोत्याशिवाय, पोम-पोम (गोंड्याची) प्रकाची डिझाइन देखील आकर्षक दिसेल.
हेही वाचा : अशी नेसा साडी, सुटलेलं पोट दिसेल आकर्षक