Friday, February 23, 2024
घरमानिनीFashionबाहेर फिरायला जाताना अशी करा हेअरस्टाईल

बाहेर फिरायला जाताना अशी करा हेअरस्टाईल

Subscribe

हेअरस्टाईल काय करायची असा प्रश्न हल्ली सगळ्यांना बाहेर पडताना पडतो. जेवढी छान हेअरस्टाईल तेवढा तुमचा चेहरा उठून दिसतो. पण आपल्याला प्रत्येकवेळी कोणती हेअरस्टाईल करायची हे समजत नाही. अशावेळी सोप्यात सोपी सूटेबल हेअरस्टाईल कशी आणि कोणती करायची हे जाणून घेणार आहोत. सिम्पल आणि झटपट होणारी हेअरस्टाईल सगळ्यांना आवडते. आजकाल ट्रेंडी हेअरस्टाईल खूप आल्या आहेत. पण तुम्हाला हव्या तश्या आणि चेहऱ्यानुसार हेअरस्टाईल जर का करायच्या असतील तर रोजच्या रोज या हेअरस्टाईल घरी करून बघा. म्हणजेच बाहेर जाताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तसेच या हेअरस्टाईलमुळे तुमच्या लूकला सुद्धा नवीन पर्याय मिळेल.

5 Simple On-the-go Hairstyles For Frizzy Hair | Hair styles, Medium length  hair styles, Hair

- Advertisement -

1. बन हेअर स्टाइल

लग्नसमारंभात किंवा कोणत्याही खास प्रसंगी तुम्ही बन हेअरस्टाइल करू शकता. यामध्ये तुम्ही मणी आणि फुलांची मदत घेऊ शकता. तसेच तुम्ही अंबाडासोबत साडीवर वेणी देखील घालू शकता. तसेच रोजच्या रोज सिम्पल अंबाडा देखील घालू शकता. त्याला कलरफुल रबर्स किंवा डिझायनर क्लिप्स देखील लावू शकता.

2. पोनी हेअर स्टाइल

पोनी हेअर स्टाइल ही खूप कॉमन हेअर स्टाईल म्हणून ओळखली जाते. पण हल्ली पोनी हा खूप वेगवेगळ्या स्टाईलने बांधला जातो. तसेच हा पोनी तुम्ही जीन्स किंवा कुर्तीवर स्टाइल करू शकता.

- Advertisement -

3. ओपन हेअरस्टाईल

जेव्हा तुम्ही बाहेर फिरायला जाता तेव्हा ओपन हेअरस्टाईल करताना केसाला क्लिप्स लावू शकता. तसेच केस लहान असतील तर हेअरबॅन्ड देखील लावू शकता. यामध्ये देखील बरेच प्रकार येतात जे तुमच्या चेहऱ्याला शोभणारे असतात. कोणत्याही कार्यक्रमात जाताना तुम्ही ओपन हेअरस्टाईला फॅशनेबल ब्रोच लावू शकता. त्यामुळे तुमची हेअरस्टील उठून दिसेल. तसेच हा डिझायनर किंवा फॅशनेबल ब्रोच तुमच्या कडे नसेल तर तुम्ही तुमच्या केसांची वेणी देखील बांधू शकता. यामुळे तुम्हाला एक नॅचरल लूक मिळेल.

4. साईडर वेणी

अनेक वेळा मुलींना असे वाटते की त्यांचा डावा किंवा उजवा चेहरा अधिक चांगला दिसतो. अशा परिस्थितीत मुली अनेक हेअरस्टाईल करताना पाहायला मिळतात. तसेच ज्यांचा चेहरा गोलाकार आहे त्यांनी सुद्धा अशी हेअरस्टाईल करून बघा. त्यामुळे त्यांचा चेहरा अधिक सुंदर आणि आकर्षित वाटेल.

5.स्लीक ओपन हेअरस्टाइल

हल्ली लॉन्ग गाऊन किंवा लॉन्ग फ्रॉक जेव्हा तुम्ही घालता. तेव्हा स्लीक ओपन हेअरस्टाइल सगळ्यात भारी वाटते. कारण यामुळे चेहरा खुलून दिसतो. तसेच ज्यांना हेअरस्टाईल पटकन कशी छान करता येईल हे समजत नसेल तर त्यांनी नक्की ही हेअरस्टाईल करून बघावी. पफ तुम्ही हातांनी कडू शकता. किंवा पफ चा स्पंज देखील तुम्ही आतल्या साईडला लावू शकता. यामुळे तुमचा हेअरकट सुद्धा छान वाटेल आणि हेअरस्टाईलचा लूकपण तुमच्यावर शोभून दिसेल.

________________________________________________________________________

हेही वाचा : फेस्टीव सिझनसाठी खास हेयरस्टाईल

- Advertisment -

Manini