हिवाळ्यात फुल्ल हॅन्ड टीशर्टची मागणी जास्त असते. तसेच आजकाल ट्रेंडी फॅशन जर का पाहिल तर विंटर टी-शर्ट आजकाल बहुतेक मुलं-मुली घालताना पाहायला मिळतात. फुल्ल हॅन्डची फॅशन हिवाळयात जास्त चालते याचे कारण म्हणजे थंडी तर आहेच पण विंटर सिजनला शोभेल असा लूक हल्ली सगळेच करतात. हिवाळ्यात ग्लॅमरस दिसण्यासाठी फुल्ल हॅन्ड टी-शर्ट्स नक्की ट्राय करायला हवेत. तसेच आजच्या फॅशन स्टाईलमध्ये विंटर टी-शर्ट्स हे वेगवेगळ्या प्रकारात आणि स्टाईलमध्ये येतात. अशातच आता आपण हल्ली विंटर टी-शर्ट्सची नेमकी कोणती फॅशन आली आहे हे पाहणार आहोत.
1.फुल स्लीव्ह टी-शर्ट
या प्रकारचे फुल्ल हॅन्ड टीशर्ट तुमच्या कडे असायला हवेत. तसेच या टीशर्टमध्ये अनेक प्रकारचे रंग देखील तुम्हाला सहज मिळतील . हे प्लॅन टीशर्ट तुम्ही कोणत्याही प्लॅन जीन्सवर घालू शकता. तसेच तुमच्या ˈवॉड्रोब’मध्ये या प्रकारचे टीशर्ट हे असायलाच हवेत. हे टीशर्ट तुम्ही डेनिम जॅकेट, लेदर जॅकेट, ब्लेझर किंवा कोणत्याही आऊटफिट्सच्या आतमध्ये हे तुम्ही घालू शकता. यासोबतच या टीशर्ट्समध्ये तुम्हाला अनेक व्हरायटी देखील मिळू शकतात.
2. फुल्ल हॅन्ड टी-शर्ट
फुल्ल हॅन्ड टी-शर्ट हे कॅज्युअल आणि स्टायलिश असा दोन्ही पद्धतीत उपलब्ध आहेत. यामध्ये असलेले डबल-टोन रंगाचे टी-शर्ट तुम्ही ऑफिसमध्ये घालू शकता. तसेच यामध्ये विविध रंगाचे टीशर्ट हे दीर्घकाळ टिकण्यासाठी याचे कॉटन देखील खूप छान आहे. तसेच दिवसभर रिलॅक्स लुक मिळण्यासाठी या खाली कोणत्याही रंगाची जेगिन्स किंवा जीन्स घालू शकता.
3.हाय नेक लॉन्ग हॅन्ड टी-शर्ट
हे टी-शर्ट्स तुम्हाला बॉडी फिटेड स्वरूपात मिळतील. तसेच यामध्ये सगळेच टीशर्ट हे लाईन डिझाइन्समध्ये जास्त उपलब्ध आहेत. या टीशर्टच्या खाली तुम्ही लॉन्ग फिश कट स्कर्ट घालू शकता. तसेच का तुमच्याकडे स्कर्ट नसेल तर बोलतां जीन्स देखील याखाली घालू शकता. हे टीशर्ट तुम्हाला एकूणच फॅशनेबल लूक मिळून देईल.
4.चॅपियन लॉन्ग हॅन्ड टी-शर्ट्स
थंडीच्या दिवसात तुमचा फिरायचा कुठे प्लॅन झाला असेल तर चॅपियन लॉन्ग हॅन्ड टी-शर्ट्स तुम्ही प्रवासादरम्यान घालू शकता. या टीशर्टमध्ये तुम्हाला थंडी लागणार नाही. हे टी-शर्ट एकदम आरामदायी आहे. तसेच हे टी-शर्ट तुम्ही जीन्स किंवा जेगिंगवर घालू शकता. या दोघांपैकी जर का तुमच्याकडे काय नसेल तर तर या खाली तुम्ही ट्रक पॅन्ट सुद्धा छानपैकी घालू शकता.
5.क्रिवनेक लॉन्ग हॅन्ड टी-शर्ट
थंडीच्या दिवसात जर का तुम्ही डेनिम जॅकेट्स घालत असाल तर यामध्ये क्रिवनेक लॉन्ग हॅन्ड टी-शर्ट घालू शकता. तसेच या प्रकारचे टी-शर्ट ब्लॅक आणि व्हाईटमध्ये जास्त उपलब्ध आहेत. तसेच डेनिमचे कपडे जर तुम्ही घालणार असाल तर यामध्ये क्रिवनेक लॉन्ग हॅन्ड टी-शर्ट घालायला विसरू नका. यामुळे तुमचा लूक स्टायलिश तर दिसेलच आणि तुमच्या पर्सनॅलिटीवर त्याचा प्रभाव देखील पडेल.
________________________________________________________________________
हेही वाचा : हिवाळ्यात लेदर जॅकेट्स स्टाईल करताय ? या टिप्स करा फॉलो