Thursday, February 22, 2024
घरमानिनीFashionहिवाळ्यात 'या' ड्रेसिंग टिप्स करा फॉलो आणि दिसा हटके

हिवाळ्यात ‘या’ ड्रेसिंग टिप्स करा फॉलो आणि दिसा हटके

Subscribe

भारतात हिवाळा फक्त जरी तीन महिने असला तरी या हंगामात ड्रेसिंग कशी मारायची याचा विचार आपण करत असतो. तसेच हिवाळ्यात लग्न असो किंवा पार्टी, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ग्लॅमरस आणि स्टायलिश लूक्स ट्राय करत असतात. तसेच थंडीपासून बचाव करण्यासाठी हिवाळ्यातील कपड्यांचे मुख्य काम म्हणजे शरीराला उबदारपणा राखण्याबरोबरच त्याचा स्टाइलकडेही लक्ष दिले जाते. याचबरोबर हिवाळ्यात स्वेटर, मफलर, कॅप आणि सॉक्सचा ट्रेंड सुरु झालेला पाहायला मिळतोय. अशातच आपण हिवाळयात हटके दिसण्यासाठी या टिप्सला फॉलो करू शकतो ज्यामुळे तुम्हाला विंटर लूक सहज मिळतो. चला तर मग जाणून घेऊया थंडीत कसे वेगळे आणि उठाव दिसाल.

How Often Should I Wash My Winter Clothes? | MBS

हिवाळ्यात वेगळे कसे दिसावे?

  • हिवाळ्या जर का तुम्ही सहलीसाठी तयारी करत असाल तर त्यासाठी तुम्ही थंडीच्या कपड्यांचे तसे नियोजन करा.
  • आणि त्यानुसार कपडे विकत घ्या. कोणत्या शहरात किती थंडी आहे याचे संशोधन करा आणि त्या प्रकारे कपडे घाला.
  • लग्न असो किंवा पार्टी मखमली, सिल्क, ब्रोकेड फॅब्रिकपासून बनवलेले पोशाख आणि जॅकेट हे प्रत्येक हंगामात घातले जाऊ शकत नाहीत.
  • तसेच या कपड्यांची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही या कपड्यांना फक्त पारंपारिकच नाही तर वेस्टर्न लुकमध्येही ट्राय करू शकता.
  • जर तुम्ही कोणत्याही ब्रँडला घेऊन कॉन्शियस असाल आणि या सीझनमध्ये कोणते कपडे घालायचे हे कळत नसेल तर चिंता करण्याचे काहीच कारण नाही.
  • तसेच मार्केटमध्ये असे अनेक ब्रँड आहेत जे पार्ट्या किंवा इतर प्रसंगांसाठी बाजारात उपलबद्ध आहेत.
  • त्यामुळे तुम्हाला फक्त तुमच्या आवडीनुसार योग्य कपडे निवडावे लागतील.
  • तसेच हिवाळ्यात पाय उबदार ठेवणे खूप महत्वाचे आहे. उबदार स्टायलिश मोजे विशेषतः यासाठी आहेत, जे तुमचे पाय उबदार ठेवतील आणि यामुळे सँडलचा लुक सुद्धा खराब दिसणार नाही.

हेही वाचा :  नेटेड साडीच्या ‘या’ डिझाइन्स देतील सेलिब्रिटी लूक

- Advertisment -

Manini