Thursday, April 18, 2024
घरमानिनीFashionHigh Heels : हाय हिल्स घातल्यावर पाय दुखतात? 'हे' करा उपाय

High Heels : हाय हिल्स घातल्यावर पाय दुखतात? ‘हे’ करा उपाय

Subscribe

पार्टी असो किंवा कॉर्पोरेट मीटिंग, हाय हिल्स हा महिलांच्या पेहरावाचा अविभाज्य भाग आहे. आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या हिल्स उपलब्ध आहेत आणि महिलाही त्यांच्या आवडीनुसार त्यांची खरेदी करत असतात. महिला उंच, ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसण्यासाठी हाय हिल्सच्या (उंच टाचांच्या) चपला, सँडल्सचा वापर करत असतात. हाय हिल्सच्या चपलांमुळे व्यक्तीमत्वात बदल दिसतो. हाय हिल्समुळे तुम्ही केवळ उंचच दिसत नाही तर दिमाकदार आणि कॉन्फिडंटही वाटता. जास्त वेळ घातल्यास पाय दुखू लागतात. मात्र अनेक वेळा महिला स्मार्ट लूक मिळविण्यासाठी त्रास सहन करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. तुम्हीही या फेस्टिव्ह सीझनमध्ये स्मार्ट लुक मिळवण्यासाठी हाय हिल्स खरेदी करणार असाल तर या काही महत्त्वाच्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा.

योग्य आकाराच्या उंच टाच

हाय हील्स फुटवेअर घालताना पायांच्या आकारानुसार योग्य फुटवेअर न निवडल्याने देखील वेदना होतात. म्हणून कोणतेही फुटवेअर निवडण्यापूर्वी एकदा आपल्या पायाचा आकार तपासा.

- Advertisement -

प्लॅटफॉर्म हील्स

तुम्हाला स्टाइल तसेच आरामशीर कॅरी करायचे असेल, तर पॉइंटेड किंवा पेन्सिल हील्सऐवजी ब्लॉक हील्स आणि प्लॅटफॉर्म हील्स निवडा. हे पेन्सिल हील्स पेक्षा अधिक आरामदायक आहेत.

हाय हिल्स किंवा शूज घालण्याची योग्य पद्धत

  • फुट क्रैम्‍पस टाळण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ हाय हिल्स घालणे टाळावे लागेल. विशेषत: तुम्हाला हे लक्षात ठेवले पाहिजे की 6 तासांपेक्षा जास्त वेळ हाय हिल्स घालू नका.
  • दिवसा हाय हिल्स घालावे. यामुळे पायांवर जास्त वजन पडत नाही.
  • तुम्हाला 2 इंचापेक्षा जास्त हिल्स घालण्याची आवश्यकता नाही. हिल्स आणखी पातळ असल्यास पाय आणि पाठीवर जास्त दबाव येईल.
  • जर तुम्हाला अधिक चालत जायचे असेल तर त्या दिवशी हिल्सऐवजी स्‍नीकर्स घाला, ते अधिक आरामदायक आहेत.
  • एक ही सँडल 2 दिवसांपेक्षा जास्त वेळा घालण्याची चूक करू नका, यामुळे पाय दुखू शकतात.

हाय हिल्समुळे पायांना होतोय त्रास ? हे उपाय करुन पहा

पेशींचा व्यायाम

जर तुम्ही हाय हिल्सच्या चपला किंवा सँडल्स रोज वापरत असाल तर तुम्हाला पायांचा आणि मांसपेशींचा व्यायाम करणे आवश्यक आहे. प्रत्येक पायाचा व्यायाम किमान 1 मिनिटं तरी करा. हा व्यायाम दिवसातून 2 ते 3 वेळा करणे महत्वाचे आहे. त्यामुळे तुमच्या पायाच्या पेशी रिलॅक्स होतील व पायाचे दुखणे कमी होईल. तसेच हिल्समुळे काही लागण्याचा धोकाही कमी होईल.

- Advertisement -

हिल्स खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

जेव्हा तुम्ही हाय हिल्सच्या चपला अथवा सँडल्स विकत घ्यायला जाल, तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्या पायाच्या आकारानुसार चप्पल घ्या. खूप घट्ट किंवा खूप सैल चप्पल घेऊ नका. घट्ट चपलेमुळे पायांवर ताण येऊ शकतो. आणि चप्पल खूप सैल असेल तर चालताना पाय वाकडातिकडा पडून पाय मुरगळण्याची किंवा तुम्हाला लागण्याचा धोका असतो.

घरगुती उपाय

  • टाचांच्या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही आल्याचा डेकोक्शन पिऊ शकता. लवंगाच्या तेलामध्ये वेदना कमी करणारे गुणधर्म देखील आहेत.
  • या तेलाने मालिश केल्याने दुखण्यापासून आराम मिळतो.
  • तुम्हाला हवे असल्यास गरम पाण्याच्या बादलीत मोहरीची छोटी वाटी टाका आणि मग त्यात पाय ठेवून बसा. यामुळे दुखण्यापासून आराम मिळेल.
- Advertisment -

Manini