Monday, April 15, 2024
घरमानिनीFashionFashion : थंडीतल्या कपड्यांना या प्रकारे करा लेअरिंग...

Fashion : थंडीतल्या कपड्यांना या प्रकारे करा लेअरिंग…

Subscribe

हिवाळयात आपण बरेच वेगवेगळे कपडे ट्राय करतो. जेणेकरून आपल्याला थंडीत कूल आणि फॅशनेबल दिसायला आवडेल. यासोबतच थंडीमध्ये कपडे घालताना त्यांना लेअरिंग नुसार घालणे खूप गरजेचे आहे. पण लेअरिंग करताना कपड्यांची फॅशन करणे कठीण जाते.

तसेच जर का ज्या ठिकाणी तुम्ही आहात तिथे थंडी सुद्धा खूप असेल तर लेअरिंग नुसार कपडे घालणे म्हत्वाचे आहे. अशातच आता आपण काही टिप्स पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्ही लेअरिंग सोबत फॅशनेबल दिसू शकता.
या सगळ्या कपड्यासोबत तुम्ही हिवाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी स्कार्फ, हातमोजे आणि टोपी देखील वापरू शकता. तसेच हिवाळ्यात स्कार्फ आणि हातमोजे घातल्याने तुम्ही उबदार तर राहालच पण स्टायलिश देखील दिसाल.

- Advertisement -

6 Tips How to Style Your Winter Outfit - Inifd

1. थर्मल स्वेटर

हिवाळ्यात हेवी स्वेटर किंवा जॅकेट घालण्याआधी त्यामध्ये बेस लेयर घालणं महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्ही कोणताही हलका आरामदायक थर्मल घालू शकता. तसेच थर्मल हा आपल्याला थंडीत उबदार ठेवण्यास मदत करतात.

- Advertisement -

2. स्टेटमेंट आऊटरवेअर

थंडीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, तुम्ही तयार केलेले जॅकेट किंवा कोणतेही अनोखे जॅकेट घालू शकता. जेणेकरून तुमची स्टाईल त्यात अजून उठून दिसेल. तसेच स्टेटमेंट आऊटरवेअरमुळे तुम्हाला उबदार तर वाटेल आणि यामुळे तुम्ही स्टायलिश सुद्धा दिसाल.

3. टेक्शर आणि कापडाचा प्रकार ओळखा

हिवाळा हा हंगाम अनेक फॅशनच प्रयोग करण्यासाठी योग्य मानला जातो. या काळात तुम्ही वेगवेगळे कपडे मिस-मॅच करू शकता आणि ते घालू शकता. उदाहरणार्थ, आपण लेदर जॅकेटसोबत कोणतेही प्लॅन स्वेटर जॅकेट किंवा हेवी कॉलर जॅकेटच्या आतमध्ये शर्ट घालू शकतो.

4. टर्टलनेक लेयर असे स्टील करा

टर्टलनेकचे आऊटफिट्स कधीही फॅशनच्या बाहेर जात नाहीत. ते नेहमीच ट्रेंडी लुक देतात. तसेच हे केवळ तुम्हाला उबदार ठेवण्यास मदत करत नाहीत तर ते ऑल टाइम खूप ट्रेंडी देखील दिसतात. टर्टलनेकमध्ये तुम्ही स्वेटर, ड्रेस किंवा ब्लेझरसोबत टर्टलनेक घालू शकता. यामुळे तुम्ही स्टायलिश दिसाल आणि उबदारही राहाल.

________________________________________________________________________

हेही वाचा : दुपट्टयांशिवाय स्टाईल करता येणारे लेहेंग्याचे डिझाइन्स

 

 

- Advertisment -

Manini