फॅशनेबल लोकांसाठी हिवाळ्याचे दिवस आणखी खास असू शकतात. त्यामागचे कारण वेगवेगळ्या प्रकारची फॅशन जपण्यासाठी हा ऋतू खास संधी देणारा असतो. स्वेटशर्ट आणि हुडीज घालणे असो किंवा टी-शर्टवर जॅकेट असो ही फॅशन आजकाल ट्रेंडमध्ये आल्याचे पाहायला मिळते. लेदर जॅकेट कधीही कालबाह्य होत नाहीत. आणि त्यामुळेच ही फॅशन नेहमी चालत असते.
लेदर जॅकेट विंटर वार्डरोबमधील सर्वोत्तम स्टायलिश आऊटफिटपैकी एक आहे. पण हे जॅकेट घेण्यासाठी जास्त पैसा सुद्धा मोजावे लागतात. यासोबतच हे जॅकेट स्टाईल करण्यासाठी काही टिप्स सुद्धा फॉलो करणे महत्वाचे आहे.
1. ब्राउन जॅकेट सोबत ब्लॅक कॉम्बिनेशन टाळा
काळ्या रंगासोबत तपकिरी रंग सहज मॅच होतो. पण ज्यावेळी आपण लेदर जॅकेटचा विचार करतो तेव्हा पूर्ण लक्ष जॅकेटवर असावे. जेव्हा तुम्ही ब्राऊन जॅकेट घालता त्यामध्ये व्हाईट रंगाचे टीशर्ट घाला. यामुळे तुमचा एकूणच लूक छान वाटेल.
2. लेदरचा जॅकेट घेताना तपासून पहा
लेदर जॅकेट हे तरुणांनाचा आवडीचा विषय आहे. लेदर जॅकेट हे विकत घेताना त्याच्या कापडाकडे विशेष लक्ष द्यावे लागते. तसेच लेदर जॅकेट घेताना बरेचजण त्याच्या कपड्याचा विचार करत नाही. जे दिसेल ते लगेच घेतात पण तुम्ही असे करू नका. यामुळे तुमचे पैसे फुकट जाऊ शकता. लेदर कसे आहे हे ओळखण्यासाठी लेदर जॅकेटच्या कपड्याची आधी माहिती मिळून घ्या. आणि मगच जॅकेट खरेदी करायला जा.
3. मशीनमध्ये लेदर जॅकेट धुवू नका
लेदर जॅकेट कधीच मशीनमध्ये धुवू नका. जर का हे तुम्ही मशीनमध्ये जॅकेट घातले तर ह्याचा कापड खराब होऊ शकतो. तसेच याला असली झिप देखील त्यामुळे खराब होऊ शकते. जर का लेदर जॅकेटवर कसला डाग पडला असेल तर काळजी करण्याचे यामध्ये काहीच कारण नाही. हा डाग तुम्ही कोणत्याही डिटर्जनच्या सोल्युशने धुवू शकता.
4. लेदर जॅकेटची फिटिंग महत्त्वाची
लेदर जॅकेट ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे तुमची स्टाईल त्यात उठून दिसते. तसेच ही स्टाईल तुमच्या बॉडीला शोभणारी असायला हवी. हे जॅकेट घेताना तुमच्या बॉडीला फिट आणि व्यवस्थित बसेल असेच जॅकेट तुम्ही विकत घ्या. महत्वाचे म्हणजे लेदर जॅकेट खरेदी करताना फिटिंगवर लक्ष केंद्रीत करणे खूप महत्त्वाचे आहे. फिटिंग बरोबर नसेल तर तुमचे पैसे फुकट जाऊ शकतात.
5. लेदर जॅकेट ओलसर राहणार नाही याची काळजी घ्या
पावसात आणि बर्फात तुम्ही लेदर जॅकेट घालू शकता. पण हे जॅकेट ओले झाले असेल तर त्याला नीट सुकवा. कारण यामध्ये असलेले बारीक छिद्र तुमचं लेदर जॅकेट खराब करू शकते. लेदर जॅकेटला जर का जास्त पाणी लागले तर ते पूर्णपणे खराब होऊ शकते. त्यामुळे जॅकेट धुतल्यानांतर आणि भिजल्यानंतर याची विशेष काळजी घ्यावी लागते.
________________________________________________________________________
हेही वाचा : कूल कूल थंडीसाठी वूलन शॉल