Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Fashion कानाचे छिद्र मोठे असेल तर 'या' टिप्स करा फॉलो

कानाचे छिद्र मोठे असेल तर ‘या’ टिप्स करा फॉलो

Subscribe

प्रत्येक मुलीला छान राहायला आणि छान दिसायला नेहमी आवडते. यासाठी मुली अनेक प्रकारे शॉपिंग करताना दिसतात. अशातच दागिने कोणते आणि कसे घालायचे हा प्रश्न मुलींना नेहमी पडत असतो. प्रत्येक ड्रेसवर वेगवेगळ्या प्रकारचे कानातले मुली या आवडीने घालत असतात. अशातच छोटे कानातले आणि मोठे कानातले यामध्ये आपल्याला नेहमी समजत नाही कोणते कानातले कशावर घालायचे.

तसेच जर का तुमच्या कानाचा होल मोठा असेल तर तुम्ही मोठे कानातले घालणे नेहमी टाळतात. पण अशावेळी आपल्याला काहीच पर्याय नसतो आणि आपण छोटे कानातले विकत घेतो. पण आता कोणत्याही प्रकारचे कानातले घालताना टेन्शन घ्यायाची गरज नाही. कारण तुम्ही आता कानातले घालताना या टिप्स वापरा ज्यामुळे तुमचा कानाचा होल मोठा होणार नाही. किंवा जर का मोठे कानातले घातले तर कानाचा होल मोठा होईल याचे टेन्शन घेण्याची काय गरज नाही.

- Advertisement -

Second Ear Piercing Collection: How To Style The Earring Trend Of The – STAC Fine Jewellery

कानातले घालण्यासाठी सर्जिकल टेप वापरा

जरा का तुम्हाला झुमका घालायला आवडत असेल. पण तुमच्या कानाचे छिद्र मोठा असेल तर ही टिप्स वापरून पाहा. तसेच कोणतेही मोठे कानातले घातल्यावर जर तुमचे कान खाली येत असतील तर कानातले घालण्यापूर्वी सर्जिकल टेपचा वापर करा. तसेच ही टेप तुम्हाला कोणत्याही मेडिकल शॉपमध्ये सहज मिळेल. कानाच्या होलावर ही टेप लावा आणि मग कानातले घाला. यामुळे तुमचे कान सुरक्षित राहतील. तसेच या टिप्सच्या मदतीने तुम्ही हे कानातले कुठेही घालू शकता.

मोठे कानातले घालताना साखळीचा वापर करा

- Advertisement -

जर तुम्हाला कानातले घालताना त्रास होत असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत चेन जोडून स्टाइल करू शकता. अशा प्रकारे तुम्ही जड कानातले देखील घालू शकता. कारण त्यात तुम्हाला आधारासाठी साखळी मिळेल. जेणेकरून तुमचे कान लटकणार नाहीत. यामुळे कानाला आराम मिळेल. तसेच मोठ्या कानातल्याना साखळी किंवा चैनमूळे शोभा येते. तसेच या प्रकारचे कानातले तुम्ही लग्नसोहळ्यातही घालू शकता. ज्यामुळे तुम्हाला एक परफेक्ट लूक मिळेल.

हलक्या वजनाचे कानातले घाला

ज्या स्त्रियांचे कानाचे छिद्र लहान आहेत किंवा ज्यांना जड कानातले घालणे कठीण जाते. अशा स्त्रियांनी नेहमी हलके आणि कमी वजनाचे कानातले घ्यावे. जेणेकरून कानाला याचा त्रास होणार नाही. तसेच यामध्ये तुम्हाला कानातल्यांचे अनेक पर्याय देखील मिळतील. यामध्ये तुम्ही स्टड इअररिंग्स, स्मॉल ड्रॉप इअररिंग्स आणि हुप्स इअररिंग्स देखील तुम्ही घालू शकता. यामुळे तुमच्या कानाला वेदना होणार नाहीत आणि तुम्ही ते सहजपणे घालू शकाल.


हेही वाचा : ऑफिस वेअर ते सण-समारंभ… अशा ट्रेंडी बुगड्यांचा करा वापर

- Advertisment -

Manini