Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Fashion Online मागवलेले कपडे न धुता वापरल्यास पडाल आजारी

Online मागवलेले कपडे न धुता वापरल्यास पडाल आजारी

Subscribe

आपण नेहमी मॉल आणि शोरूम किंवा ऑनलायन कपडे खरेदी करतो, आणि कपडे न धुता सरळ घालतो. ही सवय आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते हे तुम्हाला माहिती आहे का? कपडे न धुता घातल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो, हे आपण आज जाणून घेऊ या.

जेव्हा तुम्ही ऑनलायन कपडे घेलता, हे कपडे घालून ते योग्य आहेत का नाही? हे तुम्ही चेक करता. जर तुमच्या कपड्याची फिटिंग योग्य आहे का नाही. जर फिटिंग बरोबर नसेल तर तुम्ही ते कपडे परत करतात. काही वेळा तर लोक ऑनलाईन कपडे घालून, नंतर ते परत करतात, असेच दुकान किंवा मॉलमध्ये लोक ट्रायल रुममध्ये जाऊन कपडे घालतात आणि कपडे न आवडल्यास तिथेच सोडून देतात. हेच कपडे पुन्हा रॅकवर लावले जातात. यानंतर हे कपडे दुसऱ्या लोकांना विकले जातात.

- Advertisement -

इंदौरमध्ये डर्मेटोलॉजिस्ट डॉ. राजेश कटारिया म्हणतात की, हे कपडे घातल्याने इन्फेक्शन आणि आजार होण्याचा धोका खूप वाढतो. परदेशात ट्रायल रुममधील कपड्यांवर रिसर्च झाले आहेत. या रिसर्चमध्ये कळाले की, हे कपडे तुमच्या शरीरासाठी धोकायदायक आणि बॅक्टेरिया आणि व्हायरस आढळून आले आहेत.

नवीन कपड्यांवर असतो बॅक्टेरिया

- Advertisement -

पीएमसी या वैद्यकीय जर्नलवरील अशाच एका रिसर्जमध्ये धक्कादायक खुलासा झाला की, ट्रायल रूममध्ये वापरल्या जाणाऱ्या नवीन कपड्यांवर मृत त्वचा, लाळ, घाम, बॅक्टेरिया आणि व्हायरस आढळून आले. या बॅक्टेरियामुळे प्रायव्हेट पार्ट्समधील फंगस आणि बॅक्टेरिया कपड्यांवर चिकटलेले आढळले. ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत, परंतु कपड्यांमध्ये बराच काळ जिवंत राहतात. घाम फुटलेले लोक ट्रायल रूममध्ये पोहोचतात आणि पॅंट, शर्ट ते अंडरगारमेंट्सपर्यंत चेक करतात, असे कपडे रोगांचे घर आहेत. ज्यामुळे डायरियापासून ते लैंगिक संक्रमित आजारांपर्यंत संसर्ग होऊ शकतो.

 केमिकल श्वासमार्गे शरीरात जाऊ शकतात

2014 मध्ये स्वीडनच्या स्टॉकहोम यूनिवर्सिटीमध्ये झालेल्या रिसर्चनुसार, नवीन कपड्यामध्ये ‘क्विनोलीन’ नावाचे एक केमिकल दिसतो. खासकरून पॉलिएस्टर कपड्यात या केमिकलचे प्रमाण जास्त आहेत. या केमिकलमुळे कॅन्सर आणि ट्यूमर होण्याची शक्यता आहे, असे अमेरिकेच्या एनवाअरमेंट प्रोटेक्शन एजेंसीने सांगितले आहे. तसेच कपडे बनविताना वापऱ्यात येणाऱ्या नाइट्रोएनिलीन आणि बेंजोथियाजोल्स सारके केमिकल वापरले जातात. हे केमिकल कपड्यावर राहते, यामुळे त्वचा आणि श्वासामार्गे शरीरात जाते. यामुळे कॅन्सर होऊ शकतो.

केमिकलची माहिती कंपनी ग्राहकांना देत नाही

कंपनी कपड्यांवरील डाग हटवणे, रंग करणे आणि सॉफ्ट बनवणे, यासाठी अनेक केमिकल वापरतात. परंतु, या कंपनी त्यांच्या लेबलवर कोणते केमिकल वापरतात, यांची माहिती ग्राहकांना देत नाही. कंपन्या कपड्यांवर फॉमेल्डिहायडसारखे केमिकल हे जास्त प्रमाणात वापरला जातो, असे वॉल स्ट्रीट जर्नल यांनी सांगितले.

कॉटनचे कपडे देखील सुरक्षित नाही

सिंथेटिक कपड्यात केमिकल्सचे प्रमाण जास्त होते. कॉटन कपडे हे सुरक्षित मानले जाता. परंतु, कापूसाचा वापर करताना होणाऱ्या पेस्टिसाइयस सुती कपड्यामध्ये देखील पोहोचू शकते. या पेस्टिसाइड हे तुमच्या शहऱ्याला धोकायदायक आहे.


हेही वाचा – लिनेन साडीची अशी घ्या काळजी

- Advertisment -

Manini