Monday, February 17, 2025
HomeमानिनीFashionसगळ्यांपेक्षा हटके दिसायचंय, तर मग हे ड्रेस सूट्स करा ट्राय

सगळ्यांपेक्षा हटके दिसायचंय, तर मग हे ड्रेस सूट्स करा ट्राय

Subscribe

स्टायलिश दिसण्यासाठी आपण अनेकदा आपल्या आउटफिट डिझाइनमध्ये बदल करत असतो. कारण बदलत्या ट्रेंडनुसार आपल्याला स्वतःचा एक लूक तयार करायचा असतो. पण असे अनेक कपडे असतात जे आपल्याला वारंवार घालायला आवडतात. सूट हे त्यापैकीच एक आहे. तसेच बहुतेक मुलींना ड्रेस सूट्स घालायला आवडतात. पण आता ट्रेंडिंग फॅशननुसार तुम्हाला तुमचा वॉर्डरोब अपडेट करावा लागेल. यामुळे तुम्हाला काहीतरी नवीन घालण्याची संधी देखील मिळेल.

Mrunal Thakur Mesmerizing Vision in Traditional Attire

1.मखमली कुर्ता सेट

सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे तुम्ही मखमली कुर्ता सेट सहज स्टाईल करू शकता. तसेच हे मखमली सूट्स स्टाईल केल्यांनतर खूप कम्फर्टेबल आणि चांगले दिसतात. यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकारचे डिझाइन मिळतील. तसेच या सूट्सची खास गोष्ट म्हणजे तुम्ही या ड्रेसला ओढणी शिवाय घालू शकता. याशिवाय बाहेर जाताना हा ड्रेस सूट तुमच्यावर उठून दिसेल.

2. अनारकली सूट

आजकाल अनारकलीची फॅशन पुन्हा ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही या प्रकारचे सूट डिझायनर पद्धतीचे घालू शकता. यामध्ये तुम्हाला हेवी कापडात अनारकली ड्रेस पाहायला मिळेल. तसेच कोणत्याही पार्टी किंवा फंक्शनमध्ये हे अनारकली ड्रेस तुम्ही घालू शकता. अनारकली सूट डिझाइन्स दिसायला पण खूप क्लासी दिसतात.

3. ओपन जॅकेट सूट

स्टायलिश दिसायचे असेल तर त्यासाठी ओपन जॅकेट सूट ट्राय करू शकता. ऑफिसमध्ये स्टाईल करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. तसेच ओपन जॅकेट सूट हे तुम्ही हिवाळ्यातही परिधान करू शकता आणि स्टाईल करू शकता. तसेच यासाठी तुम्हाला अधिक अॅक्सेसरीज घालण्याची आणि हेवी मेकअप करण्याची गरज नाही. आणि हा सूट ड्रेस तुम्ही कॅज्युअल पद्धतीने कधीही घालू शकता.


हेही वाचा : Fashion : न्यू इयर पार्टीसाठी ‘या’ प्रकारचे आऊटफिट्स करा स्टाईल

Manini