स्टायलिश दिसण्यासाठी अनेकदा आपल्याला वेगवेगळे लूक्स करायचे असतात. अशातच आपण त्यासाठी प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींची विशेष काळजी घेत असतो. पारंपारिक लूक्सबद्दल बोलायचे झाले तर, साडी असो किंवा लेहेंगा या सगळ्यावर ब्लाउज हा प्रत्येकजण विशेष डिसाईन्स वापरून स्टाईल केला जातो.
अनेक वेळा ब्लाऊज चुकीच्या फिटिंगमुळे वारंवार दुरुस्त करूनही तो आपल्याला लूज किंवा परफेक्ट बसत नाही. अशा परिस्थितीत फॅशन एक्स्पर्ट डॉली जैनने नुकताच तिच्या सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसह एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ब्लाऊजच्या फिटिंग बद्दल स्वतः सांगतेय. तसेच आपल्या खांद्याला ब्लॉउज व्यवस्थित स्टाईल करण्यासाठी त्यांनी काही सोपे हॅक्स सांगितले आहेत. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत ते स्टाइलिंग हॅक्स…
ब्लाऊज स्टाईल करण्यासाठी मॅचिंग धागा वापरा
जर तुम्ही प्रो स्टायलिंग कपडे वापरत असाल तर तुम्हाला मॅचिंग सेन्स हा असेलच. तसेच तुम्हाला कोणत्या साडीवर कोणत्या रंगाचा ब्लॉउज स्टाईल करायचा आहे याबद्दल सुद्धा चांगले ज्ञान असेलच. अशातच तुम्ही ब्लाउजला एक परफेक्ट फिटिंग देण्यासाठी तुमच्या आवडीच्या धाग्याने हे स्टायलिश ब्लॉउज स्वतः शिवू शकता. हे ब्लॉउज शिवताना लक्षात ठेवा की यासाठी, प्रथम आपल्या ब्लॉऊजच्या मोजमापाची संपूर्ण माहिती समजून घ्या आणि मगच ब्लाऊज शिवायला घ्या. तसेच त्याच वेळी, धाग्याचा रंग काळजीपूर्वक निवडा आणि ब्लाउजच्या रंगासारखा रंग निवडा जेणेकरून धागा ब्लाऊज बाहेरून दिसणार नाही आणि तुम्ही सुद्धा स्टायलिश दिसाल.
ब्लॉउज जर खांद्याला लूज असेल तर ट्रान्स्परन्ट स्ट्रेप्स वापरा
अनेक वेळा फिट करूनही ब्लाऊज खांद्यावरून पडत राहतो आणि एका जागी व्यवस्थित राहत नाही. यासाठी तुम्ही ट्रान्स्परन्ट ब्रा स्ट्रिप्स वापरू शकता. तसेच हे स्ट्रेप्स ब्लॉउजला लावताना त्याचे पट्टे तुमच्या आकारानुसार सेट केले पाहिजेत आणि ब्लाउजला लावले पाहिजेत ज्यामुळे ब्लॉउजची फिटिंग परफेक्ट दिसेल. अशातच तुमच्याकडे जर का हे ट्रान्स्परन्ट स्ट्रेप्स नसतील तर तुम्ही याला सेप्टीपिन देखील लावू शकतात. यामुळे ब्लॉऊज खांद्यावरून लूज होणार नाही.
ब्लॉऊज खांद्यातून पडत असेल तर असे करा ठिक
जरा का तुम्ही स्टायलिश ब्लॉऊज शिवला असेल आणि तो जर का तुम्हाला लूज होत असेल तर काळजी करू नका. डोली जैन यांनी सांगितल्या प्रमाणे तुम्ही तुमच्या स्टायलिश ब्लॉउजला मागच्या बाजूने डिझायनर नॉट लावू शकतात. तसेच जर का तुम्हाला एक नॉटने पर्फेक्शन वाटत नसेल तर तुम्ही या ब्लॉउजला दोन तीन नॉट देखील लावू शकतात. ज्यामुळे ब्लॉउज मागच्या बाजूने सुंदर दिसेल आणि तुम्हाला ब्लॉउज लूज आहे असे वाटणार नाही.