अनेकदा आपण ऐकलंय की प्रत्येक ड्रेस नॉर्मल उंचीच्या मुलींना सूट करतो, पण कमी उंचीच्या मुलींचे काय? अनेकदा लहान उंचीच्या मुलींना कुठलीही स्टाईल करण्यासाठी आणि आवडीचे कपडे परिधान करण्यासाठी खूपदा विचार करावा लागतो. ज्याने कधी कधी मुलींमध्ये आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो. कोणतेही कपडे घालताना किंवा कोणतीही नवीन फॅशन ट्राय करताना अनेकदा कमी उंचीच्या मुलींना एकच प्रश्न पडतो, ह्यात मी उंचीने कमी तर नाही दिसणार ना? तुमच्याबाबतीतही असं काही घडत का? जर तुमचे उत्तर हो असेल तर आता तुम्हीं अजिबात काळजी करू नका. आज आपण अशाच टिप्स पाहणार आहोत ज्याने उंची कमी असूनही तुम्ही उंचीने कमी दिसणार नाही.
जाडसर कपडे –
कमी उंचीच्या मुलींना जाडसर आणि तामझाम कपडे अजिबात शोभून दिसत नाही. खूप लेयर्स असलेले कपडे घातल्याने उंची आणखीच कमी दिसते. जर तुम्हाला लेयरिंग खूप आवडत असेल तर तुम्ही मोनोक्रोम लूक ट्राय करू शकता. यामुळे तुमची उंची थोडी जास्त दिसते.
ओव्हरसाइज कपडे –
ओव्हरसाइज कपडे आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि ते परिधान केल्यानंतर तुम्हाला खूप रिलॅक्स देखील वाटते. पण जर तुमची उंची कमी असेल तर तुम्हाला त्याचा फारसा फायदा होत नाही. याचे कारण म्हणजे सैल आउटफिट्स तुमचे संपूर्ण शरीर झाकून ठेवतात. ज्यामुळे शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागात फरक करणे खूप अवघड होऊन बसते, ज्यामुळे तुमचे शरीर लहान दिसते.
बोल्ड प्रिंट शक्यतो टाळा –
लहान उंचीच्या मुलींनी मोठे आणि बोल्ड प्रिंटअसलेले आउटफिट घालू नयेत त्याऐवजी छोट्या किंवा मध्यम प्रिंट आउटफिट्सची निवड करणे योग्य.
व्हेज हील सॅन्डल –
व्हेज हील सॅन्डल पेन्सिल हील्सपेक्षा अधिक सुरक्षित असतात आणि घालायलाही खूप आरामदायक असतात, पण कमी उंचीच्या मुलींनी असे सॅन्डल घालू नयेत. यामुळे तुमची कमी दिसेल . पण जर तुम्हाला व्हेज हील्स खूप आवडत असतील तर बारीक पट्टे आणि न्यूड रंग निवडा.
ओव्हरसाइज बॅग्ज –
ओव्हरसाइज बॅग्ज तशा भरपूर सामान घेऊन जाण्यासाठी कम्फर्टेबल असतात. पण जर तुमची उंची कमी असेल तर ओव्हरसाईज बॅग तुम्हाला शोभणार नाही. अशावेळी तुम्ही लहान किंवा मध्यम आकाराची बॅग वापरा ज्याने तुमचा संपूर्ण लूक आणि बॉडी फ्रेम वाढेल.