Saturday, March 15, 2025
HomeमानिनीFashionएथनिक लूकसाठी परफेक्ट झुमके

एथनिक लूकसाठी परफेक्ट झुमके

Subscribe

सर्वानाच सुंदर दिसायचे असते. पण दररोज त्यासाठी आपण नवनवीन कपडे घेऊन घालू शकत नाही. अशावेळी उपयोगी ठरते ती ज्वेलरी. खास करून महिलांनी ज्वेलरी कलेक्शनवर विशेष लक्ष केंद्रित केले तर त्यांना दररोज एक नवीन लूक मिळेल. यातीलच एक म्हणजे दररोज बदलला जाणारा दागिना कानातले. मार्केटमध्ये कानातल्यांचे नवनवीन प्रकार हे येतच असतात. पण, असे असले तरी सध्या ट्रेंडिंगवर आहेत ते झुमके.

सोशल मीडियावर दिसणाऱ्या अनेक टीव्ही अभिनेत्री आणि चित्रपट अभिनेत्री या लांब आणि मोठे असे झुमके घालताना आपण पाहिले असतील. यावरून लांब आणि हेवी झुमके सध्या ट्रेंडिंगवर असल्याचे समजते. पण तुम्हाला कोणते झुमके, कशावर घालायचे असा प्रश्न पडला असेल तर ही बातमी संपूर्ण वाचा.

10 Types Of Jhumka Designs You Should Know Before Buying It

गोल्डन झुमके –
पारंपरिक असणाऱ्या झुमक्यांमध्ये आपण बाजारात विविधता पाहतो. यामध्ये २, ३ किंवा त्याहून अधिक लेयर्स असलेले झुमके असतात. पण फॅशन ही दिवसाला बदलत असते. त्यामुळे मुली पारंपरिक कानातल्याऐवजी डिझायनर आणि स्टायलिश कानांतल्याना अधिक प्राधान्य देतात. नवीन डिझाइनप्रमाणे बाजारात आता गोल्डन झुमके हे मोत्यांसह येऊ लागलेत. हे झुमके एथनिक लूक करण्यासाठी बेस्ट आहेत. भरजरीच्या, काठापदराच्या साडीवर हे झुमके शोभून दिसतील.

कमळाच्या आकाराचे झुमके –
कमळाचे फूल ज्वेलरीवर खूपच सुंदर दिसते. तुम्ही बाजारात कमळाच्या डिझाइनचे कानातले पाहिले असतील. हे झुमके तुम्ही पारंपारिक, अर्ध-पारंपारिक आणि इंडो-वेस्टर्न लुकच्या कपड्यांसोबत घालू शकता.

जंक लूक झुमके –
जंक ज्वेलरीची फॅशन नवीन नसून तिचा ट्रेंड हा फार पूर्वीपासून आहे. जंक ज्वेलरी आता फक्त पारंपारिक किंवा एथनिक लुकसाठी मर्यादित राहिलेली नसून ती तुम्ही वेस्टर्न लूक आउटफिट्ससोबत ट्राय करू शकता. तुम्हाला अशा कानातल्यांसोबत मॅचिंग नेकपीस आणि नोझपिनही मिळून जाईल. कॉटनच्या साडी किंवा कुर्त्यासोबत ही ज्वेलरी फार सुंदर दिसते.

बंजारा लूक देणारे झुमके –
तुम्ही लोखंडी पोत असलेले अनेक झुमके पहिले असतील. आपण तिला बंजारा ज्वेलरी म्हणू शकतो. यात तुम्हाला खूप हेवी आणि रुंद झुमके पाहायला मिळतील. हे झुमके केवळ गोल आकारातच नाही तर त्रिकोणी आणि इतर प्रकारच्या आकारातही पाहायला मिळतात.

कुंदन आणि मोत्याचे झुमके –
जर तुम्हाला लेहेंगा, सलवार कमीज किंवा साडीसोबत कोणते कानातले घालायचे असा प्रश्न पडला असेल तर यासाठी कुंदन आणि मोत्याचे झुमके बेस्ट ऑप्शन आहे. या कानातल्यांवर तुम्हाला खास करून मीनाकारी वर्क पाहायला मिळेल. एखाद्या सण-समारंभाला जर तुम्ही हे कानातले घातलेत तर कुंदन आणि मोत्याचे कॉम्बिनेशनमुळे तुम्हाला सुंदर आणि पारंपरिक लूक मिळेल.

 


हेही वाचा;   डेनिम जॅकेट घालायच्या काही भन्नाट आयडिया

 

Manini