Thursday, April 11, 2024
घरमानिनीFashionउन्हाळ्यासाठी परफेक्ट फूटवेयर

उन्हाळ्यासाठी परफेक्ट फूटवेयर

Subscribe

उन्हाळा सुरु झाला की, कपड्यांपासून ते चपलांपर्यंत काय घालायचे असा प्रश्न अनेकांना पडतो याचे कारण म्हणजे उष्णता आणि सूर्यप्रकाश. उन्हाळ्यात तापमानातील चढउतारांमुळे थोडे चालूनही थकवा जाणवतो. ज्याने पाय दुखू लागतात. यासोबत उन्हाळ्यात जास्त घाम येतो ज्यामुळे पायाच्या त्वचेचा संसर्ग होण्याचा धोका असतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी उन्हाळ्यात परफेक्ट फुटवेअर वापरण्याची गरज असते. जाणून घेऊयात, उन्हाळ्यासाठी परफेक्ट फुटवेअर निवडण्याच्या टिप्स

फुटवेअरची निवड कशी कराल –

- Advertisement -

उन्हाळ्यात हवेत धूळ असते. अशावेळी पाय पूर्णपणे झाकणारी फुटवेअर निवडावी. जेणेकरून पायांना इन्फेक्शन होत नाही.

उन्हाळ्यात कायम अशी फुटवेअर निवडावेत, ज्यामुळे हवा आणि बाहेर येत जात राहील, अशा फुटवेअरची निवड केल्याने उन्हाळ्यात घामामुळे येणारी दुर्गंधी टाळता येते.

- Advertisement -

उन्हाळ्यात फ्लिप चप्पल किंवा सॅंडल खरेदी करण्याचा कल अधिक असतो. मात्र, उन्हाळयाच्या दिवसात टॅनिंग लवकर होते, यासाठी तुम्ही फ्लिप चप्पल किंवा सॅंडल न वापरता कॉटन शूज खरेदी करायला हवेत जेणेकरून पाय पूर्णपणे झाकले जातील आणि टॅनिंग होणार नाही.

उन्हाळ्यात उष्णतेमुळे जास्त घाम येतो, त्यामुळे फुटवेअर निवडताना ते हलके आणि आरामदायीच निवडावे. खास करून उन्हाळ्यात लेदर किंवा चामड्याचे शूज घालणे टाळावे.

या दिवसात जास्त घट्ट बूट किंवा फुटवेअर खरेदी करू नका. खूप जास्त घट्ट फुटवेअर परिधान केल्याने ब्लड सर्क्युलेशनची समस्या, सूज आणि वेदना समस्या उदभवतात.

या टिप्सच्या मदतीने फुटवेअर बनवा आरामदायी –

उन्हाळ्याच्या दिवसात फंगल इन्फेक्शनचा धोका अधिक असतो, त्यामुळे वेळोवेळी शूज किंवा चप्पल स्वच्छ करत राहा.

या दिवसात तुम्ही फुटवेअरमध्ये कॉटनचे सॉक्स घालू शकता. कॉटन पायाचा घाम शोषून घेईल.

फुटवेअर काढल्यानंतर पाय नीट स्वच्छ करायला विसरू नका आणि शूज थोडा वेळ उन्हात ठेवा, जेणेकरून शूजमध्ये बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शनची समस्या उदभवणार नाही.

उन्हाळ्यात पायांना येणारी सूज टाळण्यासाठी हिल्स किंवा टोकदार शूज, सँडल्स घालणे टाळावे.

 

 

 


हेही वाचा : Summer Fashion : उन्हाळ्यात ट्राय करा फ्लोरल प्रिंटचे ड्रेस

 

- Advertisment -

Manini