हल्ली बहुतेक मुलींना शॉर्ट ड्रेस घालणे आवडते. पार्टी किंवा कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात शॉर्ट ड्रेस स्टाईल करणारे अनेकजण आहेत. पण जर तुम्हाला आता जुन्या पद्धतीने स्टाईल करून कंटाळा आला असेल, तर तुम्ही त्यासोबत ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी या पद्धतीने घालू शकता. यामुळे तुमच्या लूकमध्ये काहीतरी वेगळेपणा येईल. त्याचबरोबर तुम्हाला काहीतरी नवीन ट्राय करायलाही मिळेल. यासाठी तुम्हाला मार्केट्स आणि ऑनलाइन असे अनेक पर्याय मिळतील. जे खरेदी करून तुम्ही तुमच्या ड्रेसला मॅच आणि स्टाइल करू शकता.
‘या’ दागिन्यांचा सेट शॉर्ट ड्रेससोबत ‘असा’ घाला
जर तुम्हाला ऑक्सिडाइज्ड दागिने घालायला आवडत असतील तर तुम्ही त्यासाठी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा संपूर्ण सेट स्टाईल करू शकता.हे दागिने दिसायला छान दिसतात. अशातच शॉर्ट ड्रेसवर असे दागिने एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही शॉर्ट मॅक्सी ड्रेस, बॉडीकॉन ड्रेस आणि स्लिट ड्रेससवर हे दागिने स्टाइल करू शकता. यामध्ये तुम्हाला नेकलेस, नोज पिन, कानातले आणि ब्रेसलेट मिळतील. हा संपूर्ण सेट एकदा तरी खरेदी करा आणि पार्टीसाठी ड्रेसवर स्टाईल करा. तुम्ही या प्रकारचे दागिने ऑनलाइन देखील खरेदी करू शकता आणि ते तुमच्या आवडीच्या आऊटफिटवर स्टाइल करू शकता.
शॉर्ट ड्रेसवर घाला ड्रॉप कानातले
अशा अनेक मुली आहेत ज्यांना नेकलेस घालायला आवड नाही. म्हणून तुम्ही ड्रेसवर ड्रॉप इयररिंग स्टाईल करू शकता . अशातच तुमच्या ड्रेसवर हे शोभून दिसतंय का हे आधी बघा. कारण मॅचिंगशिवाय असेच हे दागिने जर घातले तर तुमचा लुक खराब दिसू शकतो. यासाठी तुम्ही अँटिक डिझाइन किंवा साधे वर्क असलेले कानातले यावर घालू शकतात. अशातच मॅचिंग कानातले हे दिसायला छान दिसतात आणि घातल्यावर तितकेच स्टाइलिश सुद्धा दिसतात. अशा प्रकारचे कानातले तुम्ही मार्केटमधून खरेदी करू शकता. तसेच हे कानातले तुम्हाला रु.100 ते रु. 250 मध्ये मिळतील.
शॉर्ट ड्रेसवर चेन नेकलेस घाला
जर तुम्ही डीप नेकलाइन सोबत शॉर्ट ड्रेस स्टाइल करत असाल तर तुम्ही त्यासाठी चेन नेकलेस स्टाइल करू शकता . या प्रकारच्या नेकलेसमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स मिळतील. यामध्ये तुम्हाला हलक्या वजनाचे दागिने आणि जड वजनाचे दागिने असे दोन प्रकार मिळतील. तसेच तुम्हाला तुमच्या ड्रेसनुसार स्टाईल करता येईल. या प्रकारचे चेन नेकलेस 200 ते 300रुपयात मॉर्डन डिझाईनसमध्ये मार्केटमध्ये मिळतील.
शॉर्ट ड्रेसवर घाला अशी अंगठी
अशा अनेक मुली आहेत ज्यांना हातात अंगठी घालणे जास्त आवडते. जर तुम्हालाही तुमचे हात सुंदर दिसावेसे वाटत असतील तर तुम्ही सुद्धा या प्रकारची अंगठी वापरू शकतात. तसेच या अंगठ्यामध्ये अनेक डिझाइनस तुम्हाला पाहायला मिळतील. आणि यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या रिंग डिझाइन्स देखील मिळतील. फ्लॉवर, क्राउन आणि स्टोन स्टाइल रिंग्स अशा प्रकारच्या अनेक डिसाईन्स तुम्हाला मिळतील. तसेच तुम्ही शॉर्ट ड्रेसवर या अंगठ्या स्टाईल करू शकता. ज्यामुळे एक छान लूक मिळेल.