Friday, March 1, 2024
घरमानिनीFashionड्रेसनुसार स्टाईल करा 'फुटवेयर'

ड्रेसनुसार स्टाईल करा ‘फुटवेयर’

Subscribe

लग्न असो वा कोणतीही पार्टी महिला प्रचंड तयारी करतात. मग यात कपड्यांवर मॅचींग नेलपेंटपासून ते कोणती फुटवेयर घालायची अशा सगळ्याच गोष्टींचा विचार करण्यात येतो. पण, अनेक जणींचा ड्रेसनुसार फुटवेअर निवडताना गोंधळ उडतो. आज आपण याच संदर्भातील काही टिप्स पाहणार आहोत.

लेडीज सॅंडल – जर तुम्ही कुर्ता किंवा जीन्ससोबत काही ट्रेंडी टॉप घालायला निवडत असाल तर यासोबत सँडल घालू शकता. कारण, साधारणपणे प्रत्येक भारतीय पोशाखावर सँडल सूट होते. सँडलमध्ये अनेक प्रकार मार्केटमध्ये मिळतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा आऊटफिटवर मॅच होणारे सँडल खरेदी करू शकता.

- Advertisement -

गुजराती चप्पल – जर तुम्हाला सूट घालायची सवय असेल तर तुम्ही गुजराती सँडल घालू शकता. गुजराती सँडल क्लासी लूकसाठी बेस्ट ऑप्शन आहे. गुजराती सॅंडलची फॅशन जरी जुनी असली तरी गेल्या काही वर्षात ही फॅशन पुन्हा मार्केटमध्ये आली आहे. जी आता ट्रेंडिंगवर आहे.

- Advertisement -

पेन्सिल हिल – जर तुमची उंची लहान असेल तर ट्रेडिशनल ड्रेसवर पेन्सिल हिल घालू शकता. पेन्सिल हिलमुळे तुमची उंची तर वाढेलच शिवाय तुम्हाला रिच लूकही मिळेल. उंच टाचांच्या चप्पलांमुळे तुमचा लूक अधिक आकर्षक होतो. त्यामुळे तुम्ही जर सूट, लेहेंगा किंवा साडी नेसत असाल तर पेन्सिल हिल अवश्य ट्राय करा.

शाईन असणारी सँडल – तुम्ही शॉर्ट ड्रेस घालणार असला तर शाईन असणारी सँडल घालू शकता. याशिवाय या सँडल तुम्ही साध्या आऊटफिटवर सुद्धा घालू शकता.

कोल्हापुरी चप्पल – मराठमोळा लूक करायचा असेल तर कोल्हापुरी चप्पल अवश्य निवडा. नववारी साडी असो की, काठपदराची साडी कोल्हापुरी चप्पलने तुमचा ट्रेडिशनल लूक पूर्ण होईल.

 

 

 

 


हेही वाचा ; गोऱ्या आणि सावळ्या रंगावरही हे कलर्स दिसतात खुलून

- Advertisment -

Manini