Friday, March 1, 2024
घरमानिनीFashionस्लिम दिसायचं ,मग 'या' स्टाइलिंग हॅक्स करा फॉलो

स्लिम दिसायचं ,मग ‘या’ स्टाइलिंग हॅक्स करा फॉलो

Subscribe

निसर्गाने प्रत्येकालाच सुंदर बनवले आहे. या जगात प्रत्येकजण सुंदर आहे. त्यामुळे कोणीही बॅाडी शेमिंगकडे लक्ष न देता छान कॅान्फिडन्टली सुंदर व्हा आणि छान दिसा! आपल्या सर्वांना स्टायलिश दिसायला आवडते. पण त्यासाठी तितकीच मेहनत घ्यावी लागते. प्रत्येकाची शरीररचना वेगळी असते अशा परिस्थितीत तुमची पोटावरची चरबी वाढली असेल आणि तुमच्या कपड्यात ती ठळकपणे उठून दिसत असेल तरीही निराश होण्याची गरज नाही.

पोटाची चरबी वाढल्यामुळे काही त्रास होत नसला तरी कपडे घातल्यावर त्याचा परिणाम लूकवर दिसून येतो. बरेच लोक पोट कमी करण्यासाठी कसरतही सुरु करतात. पण रिझल्ट मिळेपर्यंत लूक कसा मेंटन करायचा? हा एक मोठा प्रश्न असतो. कारण पोटावरची वाढलेली चरबी एका रात्रीत किंवा एका दिवसांत कमी होत नाही.
पोटाची चरबी वाढली असेल तर ड्रेसिंगचा सेन्स वापरूनही तुम्ही परफेक्ट लूक सहज मिळवू शकता. यासंदर्भातीलच काही टिप्स आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

- Advertisement -

मोठ्या साइजचा ब्लेजर घालणे
जर तुम्हाला तुमच्या पोटाची चरबी लपवायची असेल तर लांब कोट किंवा ब्लेजर वापरून स्टायलिश लुक करा. यामुळे तुम्ही स्लिम दिसाल आणि तुमचे पोटहू दिसणार नाही. तुम्ही कोणत्याही ड्रेस, सूट साडी किंवा जीन्स टॅापसह स्टाइल करु शकता. हा ब्लेजर तुम्हाला बाजारात 250 ते 500 रुपयांना अगदी सहज मिळेल.

ओव्हर साइज असलेला शर्ट वापरा
आजकाल ओव्हर साइज टि- शर्ट किंवा शर्ट सगळेच वापरतात. तुम्ही मोठ्या साइजचा शर्ट शॅाट्स किंवा ओव्हर जीन्स टॅापसह घालू शकता. यामध्ये तुम्ही प्रिंटेड शर्ट, प्लेन किंवा डबल कलरचा शर्ट घेऊ शकता. या प्रकारचा शर्ट तुम्हाला बाजारात 200 ते 250 रुपयांना मिळेल.

- Advertisement -

मखमली रंगाचा लांब कोट
जर तुम्हाला काही नवीन करून पहायचे असेल तर तुम्ही एका रंगाचा मखमली लांब कोट घालू शकता. तो दिसायला साधा असली तरी घालायला तरतरीत दिसते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते ऑफिसमध्येही घालू शकता. असे लांब कोट तुम्हाला बाजारात ५०० ते १००० रुपयांना मिळेल.

- Advertisment -

Manini