Saturday, December 2, 2023
घरमानिनीFashionइरकल कपड्याचे 'असे' आहेत वैशिष्ट्यपूर्ण प्रकार

इरकल कपड्याचे ‘असे’ आहेत वैशिष्ट्यपूर्ण प्रकार

Subscribe

साडी म्हंटल की स्त्रियांना नेहमी हवीच असते. कारण बहुतेक स्त्रियांचा वीक पॉईंट हे साडी असत. महाराष्ट्रात ‘इरकल’ म्हणून प्रचलित असलेली ही साडी मूळची कर्नाटकची असून, कर्नाटकात या साडीला ‘इलकल’ साडी म्हणतात. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात इलकल आणि त्याच्या आजूबाजूच्या गावांत आठव्या शतकापासून देवांग, पद्मनाभ, पद्मशाली, वाल्मीकी इत्यादी जमातींचे विणकर, ही पारंपरिक इलकल साडी हातमागावर विणतात.

इरकल साडी कितीही जुनी असली तरी तिचा ट्रेंड जुना होत नाही. तसेच इरकल साडीमध्ये अनेक प्रकार आणि रंग देखील बाजारात उपलब्ध आहेत. इरकल साड्यांना खणाची साडी सुद्धा म्हणतात. प्रत्येक स्त्रीला वाटते की आपल्याकडे खणाची साडी हवी आणि या साडीला सुंदर असे डिसाईन्स हव्या त्या पॅटर्न तुम्हाला मिळू शकतात.

- Advertisement -

Latest Silk gown design ideas 2021 || Saree pattern long gown dress design  || Long gown designs - YouTube

1. खणाची साडी त्याचे रंग

सध्या खणाच्या साड्यांना मोठं वलय प्राप्त झालं आहे. अनेक अभिनेत्री खणाच्या साड्या नेसतात. त्यांचे फोटोही इंस्टाग्रामवर शेअर करतात. त्यामुळे आपल्याकडे खणाची साडी असावी असे प्रत्येकीला वाटतेच. अशा साड्या ऑनलाईनही उपलब्ध आहेत. यात गर्द निळा, लाल, हिरवा, मोरपिशी, कॉफी, ग्रे कलर या रंगाच्या साड्यांना जास्त मागणी आहे.

- Advertisement -

2. खणाचे ड्रेस

खणाचे ड्रेसही सध्या खूप लोकप्रिय आहेत. यातही डार्क रंगांना मागणी जास्त आहे. कुठल्याही कार्यक्रमाला हे ड्रेस छान लूक देतात. तसेच लग्नात आणि पारंपारीक सणासुदीला अशा प्रकारचे ड्रेस हल्ली सगळेच घालतात.

3. ओरिजनल इरकल साड्या

ओरिजनल इरकल साड्याही वैशिष्ट्यपूर्ण आणि परफेक्ट लूक देतात. यात तुम्ही खणाचा ब्लाऊज घालू शकता. तसा हा ट्रेंड सध्या खूप चालतो आहे. यातही डार्क रंगाचे आकर्षण जास्त आहे. तसेच चेक्स पॅटर्न,मोठी बॉर्डर आणि प्लॅन इरकल साडी या सर्व प्रकाराला हल्ली खूप मागणी असल्याचे दिसून येतंय.

4. इरकल फेब्रिकचे दागिने

सोन्याबरोबरच आता ऑक्सिडाईजच्या दागिन्यांची क्रेझ आहे. त्याचबरोबर एथनिक लूकसाठी फेब्रिकचे दागिने हटके लूक देतात. खण,इरकल,खादी आदी फेब्रिक वापरून गळ्यातले, कानातल्याचे विविध प्रकार करता येतात. जे दिसायलाही आकर्षक असतात. तसेच तुम्ही हे दागिने इरकल ड्रेस किंवा खणाच्या साडीवर घालू शकतात. ज्यामुळे एक फॅन्सी लूक येईल.

5. इरकल शॉर्ट टॉप्स

हल्ली आपण सगळेच टीशर्टच्या जागी जीन्सवर इरकलमध्ये असलेले शॉर्ट टॉप्स घालू शकतो. याला इरकल शॉर्ट कुर्ती असेही म्हणतात. तसेच हा टॉप इंडो-वेस्टर्नमध्ये सुद्धा घालता येतो. या टॉप्सला सिम्पल किंवा हेवी लूक देखील तुम्ही देऊ शकता.

6. इरकल लेहेंगा

लहान मुलींच्या कपड्यांमध्ये इरकलचा लेहेंगा अतिशय प्रसिद्ध आहे. तसेच हा लेहेंगा शिवण्यासाठी तुम्ही जुनी इरकलची साडी वापरू शकता. जर का साडी नसेल तर इरकलचा कापड किंवा खणाचा कापड देखील यासाठी वापरू शकता.


हेही वाचा : स्किन टोन नुसार निवडा साडीचा रंग

- Advertisment -

Manini