आजकाल ट्रेंडिंग फॅशनमध्ये सिम्पल ब्लॉउज डिझाइन्स खूप प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच ट्रेंडिंगमध्ये असलेले हे ब्लॉऊजेस आरामदायी आणि खूप दिवस चालणारे आहेत. हल्ली फॅशन म्हणून ट्रेंडी ब्लॉऊजेस मार्केटमध्ये खूप आले आहेत. अशातच आजकाल महिला प्लेन साड्यांवर थोडे डिझायनार ब्लाऊज शोधात असतात. पण हे ब्लॉउज बघत असताना किंवा शोधात असताना नेमका कसा ब्लॉउज शिवायचा हे समजत नाही. अशावेळी आपण नेटवर शोधतो आणि मग तसा ब्लॉउज शिवायला देतो. तर आता आपण अशा काही ब्लॉउजच्या डिझाइन्स पाहणार आहोत ज्या तुम्हाला नक्की आवडतील आणि तुमच्या साडीला देखील या परफेक्ट मॅच करतील. चला तर मग जाणून घेऊया ब्लॉउजच्या काही सिम्पल आणि सोबर डिझाइन्स.
पेंटॅगॉन नेक लाइन ब्लाउज डिझाइन
जर तुम्ही प्लेन फॅब्रिकचा ब्लाउज घातला असेल तर अशा प्रकारे तुम्ही नेकलाइनला स्टायलिश लुक देऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ब्लाउज स्लीव्हलेस देखील करू शकता. तसेच हा पंचकोणी गळा बहुतेक साड्यांवर शोभून दिसतो. पंचकोनी ब्लॉउजमूळे साडी सुंदर दिसते. तसेच त्यामुळे तुम्ही देखील साडीमध्ये उठून दिसता.
व्ही-नेक लाइन ब्लाउज डिझाइन
ज्या स्त्रियांचे रुंद खांदे आहेत त्यांना व्ही-नेक लाइन डिजाईन खूप सुंदर दिसते . तसेच या प्रकारच्या डिझाईनला आकर्षक लुक देण्यासाठी तुम्ही ब्लॉउजला गोटा-पत्ती लेस देखील लावू शकता आणि साध्या ब्लाउजला हेवी लूक देऊ शकता. अशातच जर का तुमच्याकडे बहुतेक करून बॉर्डरच्या साड्या असतील तर त्यावर तुम्ही व्ही-नेक-लाईन बॉऊज शिवू शकता. तसेच यामुळे तुम्हाला ब्लॉउज शिवताना कोणत्याही प्रकारची जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही.
गोल नेक लाइन ब्लाउज डिझाइन
जर तुम्हाला अगदी साध्या डिझाईनचा ब्लाउज घालायचा असेल तर तुम्ही यासारख्या गोल नेक डिझाइनचा ब्लाउज निवडू शकता. या प्रकारच्या ब्लाउजमध्ये तुम्ही मानेला बारीक पाईपिंग किंवा लेस लेस लावू शकता. यामुळे हा सिम्पल ब्लॉउज वाटणार नाही. तसेच लेस आणि पाईपिंगमूळे साडीला एक छान लूक मिळेल. अशातच हे लावत असताना शक्यतो मॅचिंग लेस न वापरता कॉन्ट्रास लेस लावा. कारण यामुळे ब्लॉउज सुंदर दिसेल. तसेच ब्लॉउज आकर्षक जास्त वाटेल.
हेही वाचा : Blouse Fashion : सिंपल ब्लाउजला द्या हेवी लूक