Thursday, February 22, 2024
घरमानिनीFashionनेटेड साडीच्या 'या' डिझाइन्स देतील सेलिब्रिटी लूक

नेटेड साडीच्या ‘या’ डिझाइन्स देतील सेलिब्रिटी लूक

Subscribe

ऐतिहासिक काळापासून ते आधुनिक काळापर्यंत साडीचा ट्रेंड नेहमी सदाबहार राहिला आहे. पण त्यात तुम्हाला रोज नवनवीन व्हरायटी सहज पाहायला मिळतात. आजकालच्या ट्रेंडिंग फॅशनमध्ये नेट साडीच्या डिझाईनला आणि त्यामध्ये असलेल्या प्रकाराला खूप पसंती दिली जात आहे. यासाठी आपण आता सेलिब्रिटींचे लूक देखील पाहणार आहोत.

कोणताही साडीचा लूक स्टायलिश दिसण्यासाठी लेटेस्ट फॅशन ट्रेंडनुसार साडीला स्टायलिंग करणं खूप गरजेचं आहे. तर,आता आपण सेलिब्रिटींनी परिधान केलेल्या नेट फॅब्रिकपासून बनवलेल्या साड्यांच्या काही अत्याधुनिक साड्यांच्या डिझाइन्स बघणार आहोत. तसेच या साड्या तुम्ही लग्नाच्या सिजनमध्ये कधीही घालू शकता. ज्यामुळे तुम्हाला एक परफेक्ट लूक मिळेल. अशाप्रकारे नेटेड साडी तुम्ही सोप्या पद्धतीने कशा स्टाईल करू शकता हे पाहणार आहोत.

- Advertisement -

The Collection Of Best Net Sarees As Seen On Bollywood Actresses

1. हेवी बॉर्डर नेट साडी डिझाइन

जर तुम्हाला स्टेटमेंट बॉर्डर डिझाइनची साडी घालायची असेल तर तुम्ही या प्रकारची वाइड बॉर्डर साडी नेसू शकता. या प्रकारची सुंदर साडी वेगवेगळ्या रंगात तुम्हाला डिझाइन्स केलेल्या मिळतील. तसेच अशाच प्रकारच्या फुलांची डिझाईनची साडी तुम्हाला जवळपास 3000 ते 4000 रुपयांना बाजारात सहज मिळू शकते.

- Advertisement -

2. केप स्टाईल नेट साडी

जर तुम्हाला हेवी वर्क असलेली साडी डिझाईन कॅरी करायची नसेल, तर तुम्ही फ्लोअर लेन्थ केप या प्रकारची साडी स्टाईल करू शकता आणि तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही ही साडी नेसू शकता. ही फ्रिल नेट साडी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सहज नेसू शकता. या प्रकारची साडी तुम्ही कस्टमाईझ करून नेसू शकता.

3. ब्लॅक नेटेड साडी

तुम्हाला क्लासी आणि फॅन्सी लूक मिळवायचा असेल तर तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये ब्लॅक रंगाच्या स्टायलिश साडीचा समावेश करू शकता . या सिक्विन डिझाईनची नेट साडी तुम्हाला कोणत्याही रंगात सहज उपलब्ध होईल. तसेच या प्रकारची डिझाईनची साडी तुम्हाला जवळपास 4000 रुपयांना बाजारात मिळू शकते.


हेही वाचा : बॉडीशेपनुसार करा साडीची निवड

- Advertisment -

Manini