Thursday, April 18, 2024
घरमानिनीFashionबांगड्यांच्या 'या' खास डिझाइन्स वाढवतील वधूच्या हातांचे सौंदर्य

बांगड्यांच्या ‘या’ खास डिझाइन्स वाढवतील वधूच्या हातांचे सौंदर्य

Subscribe

लग्नाचा दिवस हा प्रत्येक वधूसाठी खास असतो. या दिवशी प्रत्येक वधूला सुंदर दिसायचे असते. तीच सौंदर्य खुलण्यासाठी वधू तर्हेतर्हेच्या ज्वेलरीची निवड करते. तिच्या वेडिंग ड्रेससोबत सूट करतील अशा ज्वेलरी ती घालते. यातलीच एक म्हणजे हातातील ‘बांगड्या’ या वधूच्या हातांचे सौंदर्य वाढविण्यासाठी फार उपयोगी ठरतात. बांगड्यांमध्ये अनेक प्रकार आहेत. जसे कडा, तोडे, पाटल्या, कुंदन बांगड्या आदी प्रकार. पण वधूच्या हातांचे सौंदर्य वाढविण्यासाठी कोणत्या बांगड्या जास्त उपयोगी ठरतील ते जाणून घेऊयात,

कुंदन डिझाईन असलेल्या बांगड्या
जर तुम्हाला लग्नात ट्रेडिशनल लूक करायचा असेल तर तुम्ही रुंद आकाराच्या डिझाईनच्या बांगड्या खरेदी करू शकता. अशा प्रकारच्या कुंदन लावलेल्या बांगड्या तुम्ही घातल्यात तर तुमचा हेवी लेहेंगा लूक खुलून जाईल. तुम्ही मॅचिंग असे कुंदन डिझाइन्सच्या बांगड्या सुद्धा खरेदी करू शकता. ज्या तुमचे हातांचे सौंदर्य वाढविण्यात मदत करतील. शिवाय या बांगड्या जास्त महागही नसतात.

- Advertisement -

Indian Bridal Bangles: Types of bangles every Indian bride needs to pick up for her wedding | - Times of India

तोडे
तुम्ही जर लग्नात मराठमोळा लूक करणार असाल तर ‘तोडे’ तुम्हाला फार उपयोगी ठरतील. हातातील हिरव्या चुड्यासोबत हे ‘तोडे’ खूप सुंदर लूक देतात. याशिवाय ह्याने तुम्हाला पारंपरिक लूक मिळण्यास मदत मिळेल.

- Advertisement -

मोत्यांचे कडे अथवा बांगड्या
मोत्याचे दागिने हे आपल्याकडे फार पूर्वीपासून वापरात आहेत. लग्नात तर या दागिन्यांना अधिक पसंती दिली जाते. मोत्यांच्या बांगड्यांनी तुमच्या हाताचे सौंदर्य अधिक खुलेलंच शिवाय हातही नाजूक दिसतील.

पाटल्या
आजीच्या ‘पाटल्या’ तर सर्वाना माहीतच असतील. पाटल्या या कोणत्याही बांगड्यांमध्ये सुंदरच दिसतात. यांचा आकार एकदम चपटा असतो आणि त्यावर वेगवेगळे डिझाइन्स असतात. यावर तुम्हाला लक्ष्मी, फुल किंवा पानांच्या डिझाइन्स मिळतील. लग्नात या घातल्याने वधूला एक पारंपरिक लूक मिळतो.

मीनाकारी बांगड्या
जर तुम्हाला लग्नात बारीक डिझाइन्स असलेल्या बांगड्या घालायच्या असतील तर तुमच्यासाठी ‘मीनाकारी बांगड्या’ हा बेस्ट ऑप्शन आहे. या बांगड्या तुम्हाला लग्नात रॉयल लूक देतील.

पिछोडी
हातात सर्वात मागे घालणाऱ्या बांगडीला ‘पिछोडी’ असे म्हणतात. ही ‘पिछोडी’ क्राउनसारखी असते. म्हणजेच हीच्या
एका बाजूला कात्रीसारखी डिझाईन असते.

सर्वात महत्वाचे म्हणजे लग्नात तुमचा हाताची साईझ बघूनच बांगड्यांची निवड करा. ज्याने तुमचा वेडिंग लूक खराब होणार नाही कारण इतर दागिन्यांप्रमाणे बांगड्या सुद्धा दागिन्यांमध्ये महत्वाच्या असतात.

 


हेही वाचा; सौंदर्य खुलवण्यासाठी असा करा तूपाचा वापर

- Advertisment -

Manini