Sunday, March 16, 2025
HomeमानिनीFashionसाडीसोबत कॉन्ट्रास्ट ब्लाऊजसाठी टिप्स

साडीसोबत कॉन्ट्रास्ट ब्लाऊजसाठी टिप्स

Subscribe

हल्ली साडीसोबत कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालणे ट्रेंडिंगवर आहे. बऱ्याच महिला आणि मुली हा ट्रेंड फॉलो करताना आपण पाहतो. पूर्वीसारखं आता साडीसोबत मॅचिंग ब्लाउज घालणे राहिले नाही. साडी वेगळ्या रंगाची आणि त्यावर हटके रंगाचे ब्लाउज हा ट्रेंड आता सुरु आहे. लग्नसराईचे दिवस सुरु आहेत तुम्ही सुद्धा साडीसोबत कॉन्ट्रास्ट ब्लाउजच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी.

गुलाबी साडी –
गुलाबी रंगाच्या साडीसोबत रॉयल निळा किंवा हिरव्या रंगाचा ब्लाउज वेगळं आणि अनोखा लूक देतो. तर पिवळ्या आणि कोरल रंगाचे ब्लाउज हे सुद्धा गुलाबी साडी सोबत खूप छान दिसतील.

हिरवी साडी –

हिरव्या रंगाच्या साडीसोबत जांभळया रंगाचा ब्लाउज तुम्हला कॉम्प्लिमेंटरी लूक देतो. तर हिरव्या रंगाच्या साडीवर लाल रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाउज रिफ्रेशिंग लूक तुम्हला देईल. डल गोल्ड, व्हाईट आणि क्रीम कलरचा ब्लाउज हिरव्या साडीवर स्लिम-ट्रीमचा लूक देतो.

जांभळी साडी –

स्टायलिश लूकसाठी तुम्ही जांभळ्या रंगाच्या साडीसोबत गोल्डन किंवा पिवळ्या रंगाचा ब्लाउज घालू शकता. याशिवाय पांढरा किंवा क्रीम रंगाचा ब्लाउज तुम्ही हिरव्या साडीसोबत घालू शकता.

पिवळी साडी –

निळ्या ब्लाऊजसोबत पिवळ्या रंगाची साडी रिगल लूक देते. त्याचबरोबर काळ्या, हिरव्या आणि लाल रंगाचे ब्लाउज पिवळ्या साडीसोबत छान लूक देतो. तुमचे लग्न होणार असेल आणि हळदी समारंभासाठी तुम्हाला हटके दिसायचे असेल तर हे ब्लाउज तुम्ही घालू शकता.

लाल साडी –

स्त्री वर्गाला लाल रंगाच्या साडीचे कायमच आकर्षण राहिले आहे. जर तुम्हाला एखाद्या फक्शनसाठी रॉयल लूक करायचा असेल तर लाल साडीसोबाबत तुम्ही गोल्डन ब्लाउज घालू हाकता. जर तुम्हाला साडीत स्लिम दिसायचे असेल तर लाल साडीसोबत ऑफ व्हाईट रंगाचे किंवा काळ्या रंगाचे ब्लाउज घालू शकता.

मरून साडी –

मरुन रंगाची साडी शोभिवंत लूकसाठी बेस्ट ऑप्शन आहे. जर तुम्हाला मरून रंगांच्या साडीसोबत कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालायचा असेल तर पांढर किंवा ऑफव्हाईट ब्लाउज क्लासिक लूक देईल. याशिवाय तुम्ही ब्लॅक किंवा गोल्डन ब्लाउज देखील घालू शकता.

निळी साडी –

नाजूक आणि सिम्पल लूकसाठी निळ्या रंगाच्या साडीसोबत ऑफ व्हाईट किंवा पांढरा ब्लाउज शोभून दिसेल. याशिवाय लाल, पिवळा, गुलाबी हे रंग सुद्धा तुम्ही निळ्या साडीवर घालू शकता.

 

 


हेही वाचा : साडीत स्लिम दिसायचंय? मग ‘या’ चुका टाळा

Manini