तुम्ही कितीही महागडे चप्पल किंवा शूज विकत घ्या ते पायाला चावतातचं. यामुळे आपण नवीन चप्पल किंवा शूज विकत घेणे बंद करत नाही. उलट एक दोन दिवस तेच शूज, चपला वापरतो. पण तुम्हाला माहित आहे का की या चपला किंवा शूज चावण्याचे नेमके कारण काय ..तर याचे सगळ्यात मुख्य कारण आहे फिटींग्ज.
फिटिंग्ज
नवीन शूज -चपला घेताना आपल्याला त्याचा रंग आणि डिझाईन स्टाईल आवडली की आपण ते आधी घालून बघतो. फिटींग्ज बघण्यासाठी फार तर दोन पावलं चालूनही बघतो. पण बऱ्याचवेळा आपलीच गफलत होते. पायात घट्ट बसलेली चप्पल-बूट परफेक्ट आहेत हे समजून आपण ते विकत घेतो. पण नंतर जेव्हा ते आपण रोज वापरु लागतो तेव्हा लक्षात येतं की बूट घट्ट झालेत. त्यामुळे बोटं दाबली जाताहेत, टाचा दुखताहेत, पाय सूजतात. पायाची स्किन निघतेय. त्यामुळे या चुका टाळण्यासाठी बूट विकत घेताना ते घालून फक्त दोन तीन पावले चालू नका तर पाच सहा मिनिट तरी ते घालून बसा. नंतर दहा बारा पावलं चाला.
वॅसलिन
बऱ्याचवेळा चपला किंवा शूजचे मटेरियल कडक असते.अशावेळी चपला किंवा शूज सॉफ्ट बनवण्यासाठी त्याला आतून वॅसलिन , पेट्रोलियम जॅली किंवा खोबऱ्याचे तेल लावून रात्रभर ठेवावे. त्यामुळे शूज किंवा चपल, सँडल सॉफ्ट होते आणि पायाला दुखापत होत नाही.
शू पॅड
हल्ली बाजारात शूज मध्ये ठेवण्यासाठी पॅड मिळतात. यामुळे शूज घेताना पॅडही घ्यावेत. त्यामुळे पायाला दुखापत होणार नाही.
कुशन सोल
चपलांपेक्षा शूज घेताना विशेष काळजी घ्यावी. कडक किंवा सिथेंटीकच्या शूजमुळे पायाला दुखापत होण्याची शक्यता असते. यामुळे शक्यतो चामड्याचे किंवा कॅनवासचे शूज वापरावेत. कुशन सोलचे शूज घातल्याने पायाला आराम मिळतो.