Sunday, February 25, 2024
घरमानिनीFashionसाडीच्या निऱ्या सेट करण्यासाठी वापरा 'या' टिप्स

साडीच्या निऱ्या सेट करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

Subscribe

अनेक महिलांसाठी साडी नेसणे खूप सोपे असते. पण अनेक स्त्रियांसाठी हे खूप कठीण काम समजले जाते. अशातच फॅशन एक्सपर्ट डॉली जैन हिने तिच्या सोशल मीडियावर साडीच्या प्लीट्स कशाप्रकारे सोप्या पद्धतीने काढता येतील हे सांगितले आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही साडी सहज नेसू शकता आणि साडीला आकर्षक लूक देऊ शकाल.

Saree draper Dolly Jain shares the ultimate hack for perfect pleats. Don't miss the video - India Today

- Advertisement -

1. साडीच्या निऱ्या बारीक सेट करण्याची पहिली पायरी

 • साडीचे प्लीट्स बनवण्यासाठी तुम्ही तुमचा अंगठा आणि पहिले बोट तसेच मधल्या बोटाची सुद्धा मदत घ्यावी.
 • यानंतर, अंगठ्याच्या मदतीने एक एक करून प्लीट्स बनवा.
 • प्लीट्स बनवताना अजिबात घाई करू नका कारण यामुळे प्लीट्स सुटू शकता.
 • अशा प्रकारे तुम्ही प्लीट्स बनवून त्याला सेट करू शकता.
 • तसेच प्लेट्स सेट करण्यासाठी तुम्ही सेफ्टी पिनची देखील मदत घेऊ शकता.

Saree Draping Styles | Tutorials | Tips | Tricks - Dolly Jain

2. साडीच्या प्लीट्स सेट करण्याची दुसरी पायरी

 • साडीच्या प्लीट्स काढण्यासाठी तुम्हाला अंगठा आणि हाताच्या सर्वात लहान बोटाची मदत घ्यावी लागेल.
 • यासाठी या दोन बोटांच्या मदतीने पप्लेट्स बनवाव्या लागतील.
 • तसेच हे करत असताना मनगट हळू हळू फिरवावे जेणेकरुन प्रत्‍येक प्लेट्सचा आकार नीट दिसून येईल.
 • प्लीट्स बनवल्यानंतर या प्लीट्स एक एक करून व्यवस्थित सेट करू घ्या.

डॉली जैन से सीखिये सिल्क साड़ी पहनने का सही तरीका - जिसमें आपकी प्लीट्स होंगी परफेक्ट - DusBus

- Advertisement -

3. साडीच्या निऱ्या सेट करण्याची तिसरी पायरी

Lehenga saree styling tips by Dolly Jain: - These tips told by Dolly Jain will be useful for styling saree like lehenga - Kalam Times

 • त्यासाठी हाताच्या बोटांसोबतपोटाचीही मदत घ्यावी लागेल.
 • यामध्ये तुमचे पोट एक आधार म्हणून काम करेल आणि मग तुम्ही तुमच्या बोटांच्या मदतीने प्लीट्स बनवू शकता.
 • यानंतर, साडीच्या प्लीट्स एकत्र करा आणि त्यांना साडीच्या आत खेचून घ्या.
 • शेवटी तुम्ही फायनल टच अपसाठी सेफ्टी पिनची मदत घेऊ शकता.

हेही वाचा :  ड्रेसनुसार घ्या ‘अशा’ प्रकाराच्या ओढण्या

 

 

- Advertisment -

Manini