Tuesday, May 21, 2024
घरमानिनीFashionFashion Tips : साडीत स्लिम आणि फीट दिसायचयं?

Fashion Tips : साडीत स्लिम आणि फीट दिसायचयं?

Subscribe

साडी हे प्रत्येक स्त्रीचं पहिलं प्रेम असतं. एखादा सण असो, लग्नकार्य असो वा पूजाविधी साडी नेसल्यावर प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं. साडी ही भारतीय महिलांची पारंपरिक ओळख आहे. बदलत्या काळात साडीही आधुनिक झाली आहे. म्हणूनच आज काल साडी वापरण्याच्या पद्धतीत बदल होताना दिसून येतात. साडी नेसायची युक्ती माहीत असेल तर कोणतीही स्त्री साडीत बारीक आणि उंच दिसू शकते. यासाठीच ही साडी नेसायची योग्य पद्धत माहीत करण्यासाठी या टिप्स नक्की वाचा.

फिगरनुसार साडी

आपण साडी निवडताना आपल्या फिगरचा विचारच करत नाही. आपल्या डोळ्यात एखादी साडी बसली का आपण लगेचच ती खरेदी करतो. पण, अशी चूक करु नका. तुम्ही साडी खरेदी करताना तुमची फिगर काय आहे हे लक्षात घ्या आणि त्यानुसार साडी खरेदी करा. जर तुमची फिगर स्लिम असेल तर कॉटन, टिश्यू, सिल्क फॅब्रिकच्या साड्या खरेदी करा.

- Advertisement -

छोटी प्रिंट

जर तुम्ही थोड्या स्थुल अथवा कमी उंचीच्या असाल तर साडीत उंच आणि बारीक दिसण्याची ही एक चांगली युक्ती आहे. जरी तुम्हाला साडीवर मोठमोठ्या प्रिंट आवडत असल्या तरी छोट्या प्रिंटच्या साडीत तुम्ही बारीक आणि उंच दिसाल.

लांब हाताचे ब्लाऊज

साडीपेक्षा तुम्ही ब्लाऊज काय घालता यावर तुमचा संपूर्ण लुक अवलंबून असतो. कितीही भारी साडी असेल तर ब्लाऊज चांगलं नसेल तर त्या साडीमुळे तुमच्या सौंदर्यात भर पडणार नाही. मग जर तुम्हाला बारीक दिसायचं असेल तर ब्लाऊजची निवड जाणिवपूर्वक करायलाच हवी. लांब बाह्यांचे ब्लाऊज घातल्यामुळे तुम्ही बारीक दिसाल. कारण यामुळे तुमचे दंड झाकले जातील आणि तुमच्या खांदे आणि हाताकडचा भाग एकसमान दिसेल.

- Advertisement -

भरजरी साडी नको

खूप जणांना डिझायनर साड्या नेसायला फार आवडतात. पण त्या साड्या घेतानाही उंचीचा विचार करणे फारच गरजेचे असते. जर तुम्ही खूप भरजरी साडी घेतली तर नक्की त्यामध्ये तुमची उंची झाकोळली जाते. तुम्हाला एक प्रकारचा ग्रेस मिळत नाही. जर तुम्हाला डिझायनर साड्या निवडायच्या असतील तर तुम्ही तुमच्या साड्यांचा काठ हा थोडा डिझायनर निवडा.

साडी नेसण्याची पद्धत

बारीक दिसण्यासाठी तुम्ही साडी कशी नेसता हेदेखील खूप महत्त्वाचे आहे. आकर्षक दिसण्यासाठी पदराच्या प्लेट्स छोट्या ठेवा, साडी कंबरेत चापूनचोपून नेसा आणि योग्य पद्धतीने पिन अप करा.

हेही वाचा : Office Wear Ideas : ऑफिस लुकसाठी फॉलो करा परफेक्ट ड्रेसिंग टीप्स

______________________________________________________________
Edited By : Nikita Shinde

- Advertisment -

Manini