Monday, February 19, 2024
घरमानिनीFashionसाडीत स्लिम दिसायचंय? मग 'या' चुका टाळा

साडीत स्लिम दिसायचंय? मग ‘या’ चुका टाळा

Subscribe

प्रत्येक महिलेला साडी नेसायला खूप आवडते. काही लोकांना हेवी वर्क साड्या स्टाईल करायला आवडतात तर काहींना साध्या सिम्पल साड्या नेसायला आवडतात. अशा वेळी जेव्हा आपण साडी खरेदी करण्यासाठी बाजारात जातो तेव्हा आपण सर्वातआधी साडीची डिझाइन आणि नंतर त्याचे फॅब्रिक पाहतो. कारण साडीतल्या या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात कारण जेवढी तुमची साडी सुंदर तेवढं तुम्ही दिसणार सुंदर. अशातच जेव्हा स्लिम दिसण्याचा विचार येतो, तेव्हा नेहमी लाईट साड्या खरेदी करायला महिलांना आवडतात. आज आपण साडीत स्लिम दिसण्यासाठी कोणत्या ट्रिक्स फॉलो करायला हव्यात हे पाहणार आहोत.

1.जर तुमची हेवी ब्रेस्ट असेल तर कधीच पदर पिनअप करून नका. पदर मोकळा सोडा.

- Advertisement -

2.मार्केटमध्ये अनेक वर्क केलेल्या साड्या मिळतात. पण जर तुम्हाला साडीत स्लिम दिसायचे असेल तर तर लाईट वेट असणाऱ्या साडीची निवड करा.

- Advertisement -

3.आपण प्रत्येक साडीत परकर घालतो. पण, जर तुम्हाला साडीत स्लिम दिसायचं आहे तर तुम्ही शेप वेअर घालू शकता.

4.साडीसोबत घालण्यासाठी ब्लाउजची निवड करताना जास्त मोठे डिझाइन्स, ओल्ड फॅशन डिझाइन्स निवडू नका. स्लिव्हस आणि नेक लाइनसाठी कायम लेटेस्ट फॅशनची निवड करा.

5.जर तुम्हाला साडी स्लिम दिसायचं आहे तर लाईट रंगाच्या साडीची निवड न करता गडद रंगाची साडी निवडा.

6.साडीची निवड करताना तिचे फॅब्रिकही महत्वाचे असते. स्लिम दिसण्यासाठी शिफॉन किंवा जॉर्जेट सारख्या फॅब्रिकची निवड करा.

7.हाताचे फॅट्स लपविण्यासाठी ३/४ स्लिव्हस ब्लाउजची निवड करा.

8.साडीच्या प्लेट्स या स्ट्रेटनरच्या मदतीने सेट करा. जेणेकरून साडीचे प्लेट्स या पसरणार नाही.

9.ब्लाउजच्या नेकलाइनसाठी, कमी रुंदी ठेवावी. जेणेकरून शरीराचा आकार योग्यरीत्या परिभाषित करता येईल आणि त्यासाठी तुम्ही व्ही-नेक, स्वीटहार्ट सारख्या नेकलाईन्स निवडू शकता.

10.जर तुम्हाला बॉर्डर वर्क साडी निवडत असाल, तर कमी रुंदीचे बॉर्डर डिझाइन निवडण्याचा प्रयन्त करा. जेणेकरून शरीराचा आकार परिपूर्ण दिसेल.

 

 

 


हेही वाचा ; बॅकलेस ब्लाऊजच्या परफेक्ट फिटिंगसाठी टिप्स

- Advertisment -

Manini