स्ट्रेटकट जीन्स आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. जर तुम्ही सुद्धा स्ट्रेटकट जीन्स घालत असाल आणि त्यावर नेमकं काय घालायचं हे सुचत नसेल तर आपण आता जाणून घेणार आहोत की कशा प्रकारचे टॉप्स या स्ट्रेटकट जीन्सवर तुम्ही घालू शकता.
आपल्या आजूबाजूला अश्या बऱ्याच महिला आहेत ज्यांना स्कीनी जीन्स आवडत नाहीत कारण या जीन्स तुमच्या कर्व्ही बॉडीला जास्त हायलाइट करतात. तर स्ट्रेटकट जीन्स ही तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. तसेच ही जीन्स घातल्यावर कोणत्याही प्रकटरची अडचण तुम्हाला येत नाही. बाहेर जाताना आणि परफेक्ट लूक मिळण्यासाठी बरेचजण स्ट्रेटकट जीन्सचा वापर करताना पाहायला मिळतात.
1. लॉन्ग हॅन्ड टिशर्ट्स
जर तुम्ही रोज स्ट्रेटकट जीन्स घालत असाल तर त्यावर लॉन्ग हॅन्ड टी-शर्ट किंवा लॉन्ग हॅन्ड टॉप यावर सूट होईल. हे टी-शर्ट घालतात ते थोडे लूज असायला हवे. कारण यावर जर तुम्ही टाईट टी-शर्ट किंवा टाईट टॉप घालत असाल तर त्यावर ते सूट होणार नाही. तसेच म्हत्वाचे म्हणजे हे टॉप्स आणि टी-शर्ट जास्त मोठे किंवा उंचीए सुद्धा लांब नको कारण याचा संपूर्ण लूक खराब होऊन जाईल.
2. चेक्स शर्ट्स
ऑफिसला जाताना तुम्ही जास्त वेळा स्ट्रेटकट जीन्सचाच वापर करत असाल तर त्यावर चेक्स शर्ट्स घाला. कारण या चेक्स स्टाईलमूळे तुमचा ऑफिस लूक खास होईल. तसेच या आऊटफिटमुळे तुमचे इम्प्रेशन सर्वांसमोर चांगले पडते. तसेच चेक्स शर्ट्स घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे इन करू नका. जर का लांबीने हे शर्ट्स जास्तच मोठे असेल तरच करा ;अन्यथा ते इन करू नका. यामुळे त्या स्टाईलचा लूक सगळा बदलतो आणि ड्रेसिंग स्टाईल सुद्धा बिघडते.
3. हुडी टी-शर्ट्स
थंडीच्या दिवसात हुडी टी-शर्ट्स जास्त घातले जातात. जर का तुम्हाला स्ट्रेटकट जीन्सवर हे टीशर्ट्स घालायचे असतील तर जीन्सचा जो कॉन्ट्रास रंग असेल त्यानुसार त्यावर तसे टी-शर्ट घ्या. जर का टीशर्ट आणि जीन्स मॅचिंग झाले तर ते चांगले वाटत नाही. मॉक नेक टर्टल मॉक नेक टर्टल नेक या प्रकारच्या हुडी बहुतेक करून या जीन्सवर ट्राय करा. तसेच जास्त लूज असलेली हुडी शोभून दिसत नाही त्यामुळे अंगाच्या मापाची आणि हलकी लूज अशी हुडी त्यावर घाला.
4. डेनिम जॅकेट्स
कायम ट्रेंडी फॅशनमध्ये असणारे डेनिम जॅकेट्स हे स्ट्रेटकट जीन्स वर खूप हटके लूक देतात. डेनिम जॅकेट्स थंडीत खूप घातले जातात. तसेच डेनिम जॅकेट्सचा कोणताही रंग स्ट्रेटकट जीन्सवर चांगला दिसतो. जर का तुम्ही या जॅकेटच्या मध्ये सॅंडो किंवा प्लॅन टीशर्ट घातले तर ते अजून छान दिसते. डिझायनर डेनिम जॅकेट्स पेक्षा प्लॅन डेनिम जॅकेट जास्त चांगले वाटते. डेनिम जॅकेटमुळे तुमच्या पर्सनॅलिटीला एक आकर्षक आणि स्टायलिश लूक सहज मिळून जातो. डेनिम जॅकेट्समध्ये तुम्हाला हवा तो रंग आणि डिझाइन्स सहज मिळतात. तुमच्या बॉडी कशेपनुसार आणि जीन्सनुसार डेनिम जॅकेट्स निवडू शकता.
_________________________________________________________________
हेही वाचा : फर असणारे विंटर जॅकेट घरच्या घरी असे धुवा