हिंदू धर्मात बांगड्यांचे अतिशय महत्त्व फार पूर्वीपासून सांगण्यात आले आहेत. सणाच्या दिवशी बाजारात अनेक प्रकारच्या सर्वाधिक बांगड्या खरेदी केल्या जातात. पण आजकालचा बदलता ट्रेंड पाहता महिलांनीही सोन्याच्या बांगड्या घालायला सुरुवात केली आहे. याचे कारण असे की तुम्ही त्यांना कोणत्याही आउटफिटसोबत घालू शकतात. तसेच सोनेरी बांगड्यांना त्यांच्या रंगामुळे विशेष बदलावे लागत नाही. त्यामुळे अशावेळी तुम्ही सोनेरी बांगड्यांची डिझाईन ट्राय करा, ती खूप क्लासी दिसते आणि पारंपरिक लुकही तुम्हाला सहज देऊन जाते.
मोर डिझाइन सोनेरी बांगड्या
तुम्हाला काही अँटिक घालायचे असेल तर त्यासाठी तुम्ही मोराची डिझाईन असलेल्या सोनेरी बांगड्या घेऊ शकता. या प्रकारच्या बांगड्यांमध्ये केलेली रचना दिसायला जड असली तरी ती घालायला अतिशय क्लासी दिसते. या बांगड्यांची खास गोष्ट म्हणजे तुम्ही त्या कोणत्याही ड्रेस किंवा साडीसोबत घालू शकता. या बांगड्यांच्या डिझाईन्स तुम्ही खास सणासाठी देखील वापरू शकता.
स्टोन वर्क सोनेरी बांगड्या
जर तुम्हाला स्टोन वर्कच्या बांगड्या घालायला आवडत असतील, तर तुम्हाला सोनेरी बांगड्या मध्ये देखील अनेक प्रकारचे पर्याय मिळतील. तसेच स्टोन वर्क असलेल्या बांगड्या तुम्ही कोणत्याही आऊटफिटवर अगदी सहजपणे घालू शकता. या बांड्यांमध्ये अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. या प्रकारच्या बांगड्यांमध्ये तुम्हाला स्टोन्स वर्क अनेक पद्धतीने केलेले पाहायला मिळेल. अशातच या बांगड्या तुम्ही जास्त नाही घातलात तरी एकच बांगडी घालून तुम्ही सोनेरी स्टोन वर्क बांगड्या या घालू शकता.
साध्या सोनेरी बांगड्या
नोकरी करणाऱ्या अनेक महिला आहेत. त्यांना फॅन्सी बांगड्या घालणे आवडत नाही. त्यामुळे तुम्ही सोनेरी बांगड्यांच्या या डिझाइन्स वापरून पाहू शकता . यामध्ये तुम्हाला प्लेन डिझाईन मिळेल. जे तुम्ही सूट, साडी किंवा अगदी वेस्टर्न आउटफिटवर रोज घालू शकता. यामध्ये तुम्हाला हव्या असल्यास तुम्ही छोट्या डिझाईनच्या बांगड्या देखील घेऊ शकता नाहीतर मोठ्या डिझाईनच्या बांगड्याही घालू शकता.
मोत्याच्या बांगड्या
आजकाल कोणत्याही सभारंभात आपण साडीनुसार आणि ड्रेसनुसार बांगड्या घालतो. अशावेळी मोतीच्या डिझाइन्स असलेल्या बांगड्या घातल्यावर हाताची शोभा वाढते. यामुळे हाताला एक नवा लूक मिळतो. मोत्याच्या बांगड्या आणि त्यामध्ये सोनेरी डिझाइन्स हे फार वर्षांपासूनचे प्रसिद्ध कॉम्बिनेशन आहे. या बांगड्या तुम्ही अशाच सुद्धा घालू शकतात तसेच या मोत्याच्या बांगड्या तुम्ही इतर कोणत्याही बांगड्या सोबत घालू शकता.
हेव्ही सोनेरी बांगड्या
लेहेंगा किंवा जरीच्या साड्या यांवर हेव्ही सोनेरी बांगड्या या खूप छान वाटतात. या बांगड्या एक एलिगंट लूक आपल्या हातांना देतात. या बांगड्यांमध्ये अनेक प्रकार आपल्याला मिळतील जसे की काचेच्या वर्क केलेल्या, हत्ती किंवा मोराची डिझाइन्स असलेल्या तसेच वेगवेगळे नक्षीकाम केलेल्या बांगड्या यामध्ये आपल्याला पटकन मिळतील. तसेच हेव्ही ड्रेससेस किंवा कोणत्याही प्रकारच्या आऊटफिट्सवर या बांगड्या घातल्या तर भन्नाट लूक तुम्हाला मिळेल.
सोनेरी जाळीदार तोडे
नवरी बाई असो किंवा बाकी महिला मंडळी यांना प्रत्येक साडीवर सोनेरी जाळीदार तोडे हातात घालायला आवडतात. सोनेरी तोडे हमखास सगळीकडे अगदी स्वस्त दरात मिळून जातील. अशातच या तोंड्यांची स्टाईल ही कायमस्वरूपी महिलांची पहिली पसंद असणार आहे. त्यामुळे या सोनेरी तोड्यांना मार्केटमध्ये खूप मागणी आहे. विशेष म्हणजे तोडे हातात घातल्यावर एक भरजरीत अनोखा लूक हातांना मिळतो.