Tuesday, December 10, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीFashionWinter Fashion Tips : हिवाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Winter Fashion Tips : हिवाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Subscribe

आपण प्रत्येक ऋतूमध्ये काही तरी वेगळं ट्राय करत असतो. हिवाळा सुरू होताच आपल्या आजूबाजूला अनेक बदल पाहायला मिळतात. बदलत्या हवामानासोबत आपल्या जीवनशैलीतही बरेच बदल होत असतात. काही लोक या ऋतूमध्ये आपल्या आहाराकडे लक्ष देतात तर काहीजण या दिवसात कोणत्या प्रकारचे आऊटफिट आपण घालू शकतो याकडे लक्ष देतात. बऱ्याचदा हिवाळ्यात थंडी जास्त असल्यामुळे आपल्याला पाहिजे ते कपडे घालता येत नाही. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात , हिवाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी कोणत्या टिप्स आपण फॉलो करू शकतो.

थर्मल पोशाख 

हिवाळ्यात आपण जास्त करून उबदार कपडे परिधान करतो. जर तुम्ही काही स्टयलिश लूक करणार असाल तर थर्मल वेअर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. हे घातल्यानंतर तुम्ही त्यावर काहीही घालू शकता. या आऊटफिटमध्ये तुम्हाला थंडी देखील वाजणार नाही आणि तुम्ही स्टयलिश देखील दिसाल परंतु हे जॅकेट्स जड आणि मोठे असतात.जर तुमच्याकडेही असे जॅकेट असतील तर तुम्ही हे बेल्टच्या मदतीने हे जॅकेट स्टाइल करू शकता.

- Advertisement -

स्कर्ट आणि ड्रेस

हिवाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही स्कर्ट आणि ड्रेस दोन्ही घालू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही स्कर्ट आणि ड्रेस स्टाइल करू शकता. तुमचा लूक कुल बनवू शकता.

योग्य बूट निवडा

हिवाळ्यात आपल्या आऊटफिट आणि दागिन्यांप्रमाणे आपले शूज देखील स्टायलिश असणे अत्यंत गरजेचं आहे हिवाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही हिवाळ्यातील बूट कॅरी करू शकता. हल्ली हे विंटर बूट्स तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी सहजपणे मिळेल.

- Advertisement -

कोर्ड सेट घाला

हिवाळ्यासाठी बनलेले कोर्ड सेट केवळ आरामदायकच नाही तर स्टायलिशही असणे अत्यंत गरजेचं आहे.

ओव्हरसाईज टी-शर्ट

स्टायलिश दिसण्यासाठी ओव्हरसाईज टी-शर्ट आणि जीन्स घालू शकता. तसेच स्पोर्ट्स शूज देखील घालू शकता.

अशाप्रकारे तुम्ही हिवाळ्यात स्टायलिश दिसू शकता.

हेही वाचा : Winter Beauty Tips : हिवाळ्यात वॅक्सिंग करताना घ्या ही काळजी


Edited By : Prachi Manjrekar

- Advertisment -

Manini