मालवणी पद्धतीने उन्हाळयात फणसाची भाजी नक्की ट्राय करा. उन्हाळा आला की आमरस पुरीचा बेत होतोच यासह महाराष्ट्रात ठिकठिकाणी वेगवेगळ्या मेजवान्या आवर्जून केल्या जातात. कोकणातील अशीच एक प्रसिद्ध डिश म्हणजे फणसाची भाजी. ही भाजी विशेषतः दोन पद्धतीने केली जाते.
कच्च्या फणसाची तसेच अर्ध्या कच्च्या फणसाच्या गऱ्यांची सुद्धा भाजी येथे केली जाते. फणसाचे गरे काप करून वाळवून वर्षभर साठवून ठेवू शकता यामुळे वर्षभर कधीही तुम्ही ही चविष्ट भाजी खाऊ शकता, उपवासाला सुद्धा ही भाजी चालते.

साहित्य-
- अर्धवट पिकलेला फणस
- ओले खोबरे
- मिरची- (प्रमाणानुसार)
- मोहरी १/२ चमचा
- लाल तिखट, हळद आणि मीठ (चवीनुसार)

- Advertisement -
कृती-
- फणस फोडताना हाताला छान खोबरेल तेल लावून घ्या.
- अर्धा पिकलेला कापा फणस भाजीसाठी उत्तम ठरतो.
- नीट फणस फोडून गरे काढून घ्या. गरे मधून कापून त्याचे दोन तुकडे करा व आठळ्या वेगळ्या पाण्यात काढून घ्या.
- भाजी चटकन शिजायला हवी असेल तर आठळ्या वेगळ्या वाफवून घेऊ शकता.
- आता एका टोपात तेल (शक्य असल्यास खोबरेल तेल) घ्या.
- यात मिरचीचे तुकडे टाकून परतवून घ्या.
- यामध्ये फणसाचे काप घालून त्यावर थोडं मीठ आणि किंचित हळद घालून झाकण ठेवा.
- वाफेवर गरे थोडे मऊसूद होईपर्यंत शिजू द्या.
- मग त्यावर ओले खोबरे आणि कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
हेही वाचा : Mango Raita : उन्हाळयात घरी करा आंब्याचे रायते
- Advertisement -
- Advertisement -