Tuesday, May 30, 2023
घर मानिनी Food Recipe : अशी बनवा लुसलुशीत गोड लापशी

Recipe : अशी बनवा लुसलुशीत गोड लापशी

Subscribe

लापशी हा पदार्थ सणासुदीला बनवला जातो. तसेच उत्तर भारतातही होळी सणाच्या दिवशी लापशी तयार केली जाते. ही रेसिपी आरोग्यासाठी पौष्टिक असल्यानं जगभरातही लोकप्रिय आहे. लापशी मध्ये असलेले सत्व शरीराला पोषक घटक मिळून देतात. चला तर जाणून घेऊया लापशी तयार करण्याची स्टेप बाय स्टेप रेसिपी…

Lapsi Recipe | Gujarati | MTR Dishcovery

- Advertisement -

साहित्य-

 • 1 कप लापशी
 • 2 चमचे तूप
 • 1 कप गूळ
 • 5-6 – चिरलेले नारळ
 • 3/4 strand केशर
 • 4/5 piece काजू
 • 4/5 – मनुका
 • 2/3 pieces तुकडे पिस्ता
 • 2/3 pieces तुकडे बदाम
 • 3 कप पाणी
 • 2 piece हिरवी वेलची

Rajasthani Lapsi Recipe by Shweta Tripathi - Cookpad

- Advertisement -

कृती-

 • सर्वप्रथम कुकरच्या भांड्यात तूप गरम करा.
 • तुपात बदाम फ्राय करा. यानंतर काजू आणि मनुके फ्राय करून घ्या.
 • आता खोबऱ्याचे काप देखील तळा. फ्राय केलेली सर्व सामग्री वेगळी ठेवा.
 • यांनतर भांड्यात थोडं आणखी तूप घाला. तुपामध्ये एक कप दलिया (लापशी) नीट परतून घ्यावा.
 • दोन ते तीन मिनिटांनंतर कुकरमध्ये पाणी ओता.
 • थोड्या वेळाने दोन हिरव्या वेलच्या आणि केशर देखील मिक्स करा.
 • कुकरचं झाकण लावून सर्व सामग्री थोडा वेळ शिजू द्या. दोन शिट्या होऊ द्या.
 • कुकरचं झाकण काढा. यानंतर सामग्रीमध्ये गूळ पावडर मिक्स करा. दलियामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करा.
 • आता फ्राय केलेले खोबरे, काजू, मनुके आणि बदाम घाला. पुन्हा कुकरचं झाकण लावून दलिया १५ मिनिटे शिजू द्यावा.
 • सर्व्ह करण्यास तयार आहे पौष्टिक लापशी.

हेही वाचा : Recipe : घरी करा ढाबा style मिक्स दाल तडका,जाणून घ्या साहित्य आणि कृती

- Advertisment -

Manini