Friday, April 26, 2024
घरमानिनीKitchenRecipe: खरपूस कोथिंबिरीची वडी नक्की ट्राय करा

Recipe: खरपूस कोथिंबिरीची वडी नक्की ट्राय करा

Subscribe

कोथींबीर हा असा पदार्थ आहे ज्यामुळे प्रत्येक जेवणाला किंवा कोणत्याही पदार्थाला छान चव येते. कोथिंबीर ही आरोग्याला अतिशय फायदेशीर असून कोथिंबीरिची वडी नक्की ट्राय करा. आता आपण पाहणार आहोत कोथिंबीर वडीसाठी लागणारे साहित्य आणि कृती…

Kothimbir Vadi with Hare Pyaz Ki Chutney - Chef Kunal Kapur

- Advertisement -

साहित्य-

  • 1 कोथिंबीर जुडी
  • 200ग्रॅम चण्याचं पीठ
  • 100 ग्रॅम तांदळाचं पीठ
  • 25 ग्रॅम सफेद तीळ
  • दोन छोटे चमचे लाल तिखट
  • एक छोटा चमचा हळद
  • एक छोटा चमचा जिरं, १० ते १५ लसूण पाकळ्या, एक चमचा तेल, स्वादानुसार मीठ.

Kothimbir Vadi Recipe by Ajay Chopra - NDTV Food

- Advertisement -

कृती-

  • प्रथम कोथिंबीर बारीक चिरून घ्या. चिरलेली कोथिंबीर चाळणीमध्ये घेऊन स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी.
  • स्वच्छ धुतलेली कोथिंबीर एका परातीत घ्या.
  • मग त्यात वर दिलेले मिश्रण एकजीव करून, घट्ट मळून घ्या.
  • मिश्रण तयार झाल्यानंतर त्याचे रोल तयार करा.
  • नंतर कोथिंबीर वडीचे रोल कुकरच्या भांड्यात ठेवून, कुकरच्या ८ ते १० शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करा.
    हे झाल्यानंतर सुरीने वड्या पाडून घ्या.
  • नंतर गॅसवर तवा गरम होण्यास ठेवून, त्यावर तेल टाका.
  • तेल गरम झाल्यानंतर त्यावर कोथिंबीर वड्या मांडून सुमारे २ मिनिटं मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्या.
  • 2 मिनिटांनी वड्या पलटी करून, त्यावर थोडं तेल टाका.
  • तेल टाकल्यानंतर पुन्हा वड्या २ मिनिटं खरपूस भाजा.
  • नंतर गॅस बंद करा.
  • आता गरमागरम कोथिंबीर वडी तयार.

हेही वाचा : Pumpkin Peel Milk Chutney : दुधी भोपळ्याच्या सालीची चटणी

- Advertisment -

Manini