Tuesday, May 30, 2023
घर मानिनी Food Recipe: पेरूचे आंबट गोड लोणचे नक्की ट्राय करा

Recipe: पेरूचे आंबट गोड लोणचे नक्की ट्राय करा

Subscribe

पेरू पाहिला कि आपल्या तोंडाला पाणी सुटते. तसेच मीठ लावलेला पेरू आपण आवडीने खात असतोच. अशातच पेरूचे लोणचे शरीरासाठी हितवर्धक आहे. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पेरूचे लोणचे बनवायला सोप्पे आहे. ज्यांना पेरू खूप आवडतो त्यांनी पेरूचे लोणचे करायला विसरू नका. पेरूचे लोणचे गोड आणि मसालेदार अशा दोन्ही पद्धतीने आपण करू शकतो.

Guava Pickle Recipe: अमरुद का अचार खाने में काफी लजीज जानिए बनाने की विधि | Guava Pickle Recipe: Know how to make Guava Pickle very tasty to eat

- Advertisement -

साहित्य –

 • पेरू – मोठ्या आकाराचे – 2
 • गूळ – तुकडे – १ वाटी
 • लाल मिर्च पावडर – 1 टीस्पून
 • चवीनुसार मीठ
 • हळद पावडर – अर्धा टीस्पून
 • जिरे – 1 टीस्पून

Make Your Own: Masala Pickled Guavas | The Horticult

- Advertisement -

कृती-

 • पेरूचे लहान तुकडे करा.
 • कढईत १ टीस्पून तेल गरम करा.
 • यात जिरे घाला आणि ते शिजे प्रयन्त ठेवा.
 • पेरूचे तुकडे घालून थोडेसे परता.
 • यानंतर त्यात हळद घाला.
 • लाल तिखट घाला.
 • चवीनुसार मीठ घालावे
 • नीट मिक्स करून थोडे परता.
 • हे झाल्यावर त्यात गूळ घाला.
 • गूळ मिक्स करावे आणि ते वितळेपर्यंत परतत राहावे.
 • पेरू शिजेपर्यंत 2 मिनिटे लागतील.
 • 2 मिनिटांनंतर, गूळ वितळला आहे का ते तपासा.
 • गूळ पूर्णपणे वितळला की लोणचे तयार होते.
 • आता पेरूचे लोणचे सर्व्हिंग करण्यास तयार आहे.

हेही वाचा :  Dates Pickle : घरी करा खजुराचे गोड लोणचे

 

- Advertisment -

Manini