Monday, May 29, 2023
घर मानिनी Food Recipe: झटपट होणारी पोह्यांची भेळ

Recipe: झटपट होणारी पोह्यांची भेळ

Subscribe

खुप भूक लागली की काय खावे हे कळत नाही. ऑप्शन खुप असतात पण कधीकधी पैसे खर्च करुन ऑर्डर करणे नकोसे वाटते. अशातच तुम्ही घरी असलेल्या पोह्यांची झटपट तयार होणारी भेळ करु शकता. यामुळे तुमचे पोट ही भरले जाईल आणि काहीतरी मस्त खाल्ल्याचा आनंद ही होईल. पाहूयात कशी बनवयाची झटपट तयार होणाऱ्या पोह्यांच्या भेळसाठीचे साहित्य आणि कृती.

साहित्य-
-1 वाटी जाड पोहे
-1 बारीक कापलेला कांदा
-1 बारीक कापलेला टोमॅटो
-1 मिर्ची कापलेली
-कोथिंबीर
-1 टेबलस्पून लाल तिखट
-चवीनुसार मीठ
-लिंबू

- Advertisement -

कृती
-सर्वात प्रथम एक गोलाकार भांड घेऊन त्यात बारीक कापलेला कांदा, टोमॅटो, कापलेली मिर्ची टाका. या सर्व गोष्टी एकत्रित करा.
-आता त्यात लाल तिखट, मीठ चवीनुसार टाका.
– सर्व गोष्टी व्यवस्थितीत एकत्रित करा
-आता या मिश्रणात पोहे टाका आणि ते सुद्धा व्यवस्थितीत त्यात एकजीव करा
-असे केल्यानंतर वरुन कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाका
-तयार झाली तुमची झटपट होणारी तिखट पोह्यांची भेळ


- Advertisement -

हेही वाचा- Recipe: खरपूस कोथिंबिरीची वडी नक्की ट्राय करा

 

- Advertisment -

Manini