Prepare time: 20 - 25 mins
Cook: 25 - 30 min
Ready in: 45 min
Ingredients
- चिकन - जवळपास 1 किलो
- लसणाचे कांदे - 4
- दही - 350 ग्रॅम
- गरम मसाला
- कसुरी मेथी
- कोथिंबीर -
- लाल तिखट
- हळद
- मीठ
- तेल
Directions
- सर्वात आधी चिकन मीठ लावून स्वच्छ धुवून घ्यावे.
- लसणाचे बारीक काप करून घ्यावेत.
- यानंतर एका भांड्यात चिकनचे पीस घ्यावेत. त्यात दही, तेल, हळद, लसणाचे काप, १ चमचा लाल तिखट टाकून चिकन 3 तासांसाठी मॅरीनेट करण्यासाठी ठेवावे.
- एका कढईत तेल तापण्यास ठेवा. तेल गरम झाले की, त्यात मॅरीनेट केलेले चिकनचे पीस टाकून घ्यावेत.
- चिकन मध्यम आचेवर झाकण ठेवून शिजवून घ्या.
- चिकन शिजत आल्यावर त्यात चवीनुसार मीठ, कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून झाकण ठेवून घट्टसर ग्रेव्ही तयार करून घ्यावी.
- तुमचा संडे स्पेशल गार्लिक चिकन तयार झाले आहे.