Saturday, January 4, 2025
HomeमानिनीFashionChristmas Fashion Tips : ख्रिसमस पार्टीसाठी ग्लिटर ड्रेसेस

Christmas Fashion Tips : ख्रिसमस पार्टीसाठी ग्लिटर ड्रेसेस

Subscribe

क्रिसमसच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाते. या पार्टीसाठी आपलं आकर्षक आणि सुंदर दिसणं देखील अत्यंत गरजेचं आहे. हल्ली क्रिसमससाठी ऑनलाइन आणि बाजारात देखील खास ड्रेस आपल्याला पाहायला मिळतात. परंतु तुम्हाला काही हटके आणि ट्रेंडिंग असं घालायचं असेल तर तुम्ही या ग्लिटर ड्रेसची निवड करू शकता.

ग्लिटर ड्रेसेस हे पार्टीसाठी उत्तम आहेत. हे ड्रेस तुम्ही निश्चितपणे ख्रिसमस पार्टी घालू शकता. असे ड्रेसेस तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाईन देखील सहजपणे मिळतील. या ड्रेससची किंमत साधारणपणे 1००० ते 2००० पर्यत आहे. ख्रिसमस पार्टीसाठी आपण कोणते ग्लिटर ड्रेसेस घालू शकतो, हे आज जाणून घेऊयात.

- Advertisement -

सेक्विन्स मैक्सी ड्रेस

जर तुम्हाला लॉंन्ग ड्रेस आवडत असतील तर तुम्ही या सेक्विन्स मैक्सी ड्रेसची निवड करू शकता. या ड्रेसमुळे तुम्हाला एक नवीन लूक देखील मिळेल. या ड्रेसला तुम्ही दोन्ही ठिकाणी म्हणजे ऑनलाइन आणि ऑफलाइन देखील खरेदी करू शकता. या ड्रेसची किंमत साधरणपणे 2,000 आहे.

वी-नेक ग्लिटर ड्रेस

ख्रिसमस पार्टीमध्ये स्टयलिश लूक मिळवण्यासाठी तुम्ही हे वी-नेक ग्लिटर ड्रेस ट्राय करू शकता. तसेच तुम्ही काही मिडी ड्रेस देखील घालू शकता. हा ड्रेस तुम्ही तुमच्या पसंतीनुसार देखील स्टाइल करू शकता. या ड्रेसची किंमत साधारणपणे 1,500 रुपये आहे.

- Advertisement -

ए-लाइन सेक्विन ड्रेस

ख्रिसमस पार्टीला तुम्ही नवीन लूकसाठी ए-लाइन सिक्विन ड्रेसची निवड करू शकता. हा ड्रेस खूप सुंदर आणि आकर्षक दिसेल. या ड्रेसची किंमत 2000 रुपयांपर्यंत आहे. या ड्रेससह तुम्ही स्टायलिश फ्लॅट्स किंवा साधे कानातले देखील घालू शकता. ‘

शिमर सेक्विन ड्रेस

पार्टीसाठी शिमर ड्रेस उत्तम आहे. या ड्रेसमध्ये तुम्हाला असंख्य प्रकार आणि रंग मिळतील. हटके लूकसाठी हा ड्रेस उत्तम आहे.

हेही वाचा : ऑफिसच्या पार्टीसाठी अभिनेत्रींच्या या आऊटफिट आयडियास करा ट्राय


Edited By : Prachi Manjrekar

- Advertisment -

Manini