Prepare time: 10 min
Cook: 30 min
Ready in: 40 min
Ingredients
- चणाडाळ - 250 ग्रॅम
- पिठीसाखर - अर्धा किलो
- किसलेलं सुकं खोबरं - 200 ग्रॅम
- वेलची पावडर - अर्धा टीस्पून
- तूप - दीड टीस्पून
- मीठ - अर्धा टीस्पून
Directions
- चणाडाळ स्वच्छ धुवून घ्या आणि 3 ते 4 तासांकरिता भिजवत ठेवा. नंतर पाणी गाळून घ्या.
- डाळ पूर्णपणे भिजेल इतपत पाणी ठेवून ती कुकरमध्ये 4 किंवा 5 शिट्ट्या काढून शिजवून घ्या.
- डाळ थंड झाल्यावर ती मिक्सरमध्ये वाटून घ्या.
- आता एका पातेल्यात वाटलेली डाळ काढून घेऊन त्यात नारळ, साखर आणि मीठ घाला व मध्यम आचेवर शिजवा. सतत ढवळत राहा.
- मिश्रण सुरुवातीला पातळ असेत पण जसजसे शिजू लागेल तसतसे ते घट्ट होऊ लागते.
- मिश्रणाचे बुडबुडे तयार होऊ लागतील, मिश्रण घट्ट होऊन पातेल्याच्या बाजूंना जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत सतत आणि जोमदार ढवळत राहावे लागते.
- लवकरच त्याचा एक गोळा तयार होऊ लागेल आणि मिश्रण कोरडे होईल. आता त्यात तूप आणि वेलची पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
- मोठ्या आकाराचा ट्रे घेऊन त्याला तूपाने ग्रीस करून घ्यावे. ट्रेमध्ये हे मिश्रण ओतून साधारण एक इंच जाडीचा थर तयार करून घ्यावा.
- गरम असताना डायमंडच्या आकारात हे मिश्रण कापून घ्यावे. थंड झाल्यावर सर्व्ह करावे. अशाप्रकारे गोवन डोस मिठाई तयार आहे.